नाशकात रुग्णसंख्या घटली; मृत्यूंचा आकडा ठरतोय डोकेदुखी

दिवसभरात २ हजार ७२० रुग्ण वाढले; ३२ बाधित रुग्ण दगावले
नाशकात रुग्णसंख्या घटली; मृत्यूंचा आकडा ठरतोय डोकेदुखी

नाशिक | प्रतिनिधी

लॉकडाऊननंतर नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी व्हायला सुरुवात झालेली दिसून येत आहे. तर, करोनामुक्त होण्याचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मोठा दिलासा नाशिकला मिळाला आहे. एकीकडे दिलासा मिळत असताना दुसरीकडे करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू मात्र काही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाहीयेत. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे...

जिल्ह्यातील २ लाख ९० हजार ५६३ करोना बाधीतांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत नाशिकमध्ये ३६ हजार ९०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये १ हजार १८० ने घट झाली. आत्तापर्यंत ३ हजार ६०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज जिल्ह्यातील ३ हजार ५८३ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आज जिल्ह्यात २ हजार ७२० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये नाशिक मनपा क्षेत्रात १ हजार १८४ तर नाशिक ग्रामीणमध्ये १ हजार ४२० रुग्ण वाढले आहेत. मालेगाव मनपा क्षेत्रात ८३ तर जिल्हाबाह्य ३३ रुग्णांची आज भर पडली.

आज नाशकात ३२ रुग्णांनी प्राण गमावले. यामुळे मृतांचा एकदा वाढून ३ हजारावर पोहोचला आहे. आज नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक २५ मृत्यू झाले आहेत तर उर्वरित ७ मृत्यू नाशिक शहरातील आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com