Video : आदिवासी भागातील शेतकरी 'इतका' सुजाण पाहिजे; निकृष्ट रस्त्याची पोलखोल चर्चेत

करंजाळी | Karanjali

करंजाळी ते हरसुल (Karanjali to Harsul Road) या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक विकासकामे हाती घेण्यात आली आहे. निवडणुका (Election) आणि आचारसंहिता (Emergency) यामुळे अनेक अनेक रस्त्याची डागडुजी सुरु आहे. जिथे रस्ता नाही तिथे निकृष्ट दर्जाचे काम करत डांबर ओतले जात आहे. पेठ तालुक्यातील (Peth Taluka) आदिवासी बहुल ग्रामस्थांनी निकृष्ट रस्त्याचे काम कसे सुरु आहे याची पोलखोल केल्यामुळे हे व्हिडीओ आणि फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत...(Construction of roads inferior quality peth taluka)

ग्रामीण भागातील रस्त्यांना (Street in rural area) गेल्या अनेक वर्षांपासून मुहूर्त लागत नव्हता. काम चलावू सारखे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम याठिकाणी होत आहे. ६ कि.मीच्या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जात असताना पहिल्या पावसात हा रस्ता वाहून जाईल अशी परिस्थिती आहे.

हाताने डांबर लावलेले दगड निघून जातील अशी परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे नाशिकच्या या ठेकेदारावर कडक करावी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या कामाचे उदघाटन आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (MLA Narhari Zirwal) यांच्या हस्ते २७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या रस्त्याचे ६ कि.मी. साठी २ कोटी ३० लाख रुपयांचे निधी प्राप्त झाला असला तरीही रस्ता खोदून मजबुतीकरण, सोलींग, रोलीग व त्यानंतर उर्वरीत कामे करण्याची तरतुद आहे.

असे असतानाही त्याच पृष्ठभागावर डांबरी मालाचा १ इंचाचा थर देण्यात आल्याने रस्ता मजबुतीकरण पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तत्काळ काम बंद करून पक्का रस्ता करावा अशी मागणी करण्यात आली असून असे झाले नाही तर आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल असाही इशाराही येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com