काँग्रेस कार्यकारिणीवर नाशिकच्या ज्येष्ठांसह युवकांना संधी

काँग्रेस कार्यकारिणीवर नाशिकच्या ज्येष्ठांसह युवकांना संधी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Indian National Congress President Soniya Gandhi) यांच्या मान्यतेने राष्ट्रीय सरचिटणीस खा.के.सी.वेणूगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा केली.

या कार्यकारिणीमध्ये नाशिक जिल्ह्यातून नव्या व अनुभवी यांचा ताळमेळ साधत नवीन चेहऱ्यांना प्रथमच संधी दिली आहे.प्रदेश उपाध्यक्षपदी शहरातून विधान परिषदेचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांना तर नाशिक ग्रामीण मधून माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (पाटील) यांची नियुक्ती केली आहे. तसेच सरचिटणीसपदी माजी मंत्री शोभा बच्छाव यांना त्याच पदावर पुन्हा तर हेमलता पाटील यांना बढती देत नियुक्ती केली आहे.

युवकांमधून गेल्या १६-१७ वर्षे नाशिक जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस व प्रवक्ता म्हणून काम करणारे प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड यांना प्रथमच प्रदेश कमिटीवर स्थान मिळाले असून त्यांना प्रदेश सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर शहरातील मनपाचे नगरसेवक राहुल दिवे यांना पुन्हा त्याच पदावर संधी मिळाली आहे.

समाजिक समतोल राखण्यासाठी आदिवासी समाजातील रमेश कहांडोळे व सुमित्रा बहिरम यांची देखील सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे.

नांदगावचे माजी आमदार अनिल आहेर यांना देखील महत्वाच्या प्रदेश कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे.

या नवनियुक्त पदाधिकारी यांचे राज्य प्रभारी खा.एच.के.पाटील,प्रदेश अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले,विधिमंडळ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,आ.पृथ्वीराज चव्हाण,सह प्रभारी वामशी रेड्डी,प्रदेश कार्य अध्यक्ष प्रणिती शिंदे,आ.कुणाल पाटील,आ.सुधीर तांबे,प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर,जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे,शिरीष कोतवाल स्वागत केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com