शिक्षकांना चाचणी सह लसीकरण बंधनकारक

शिक्षकांना चाचणी सह लसीकरण बंधनकारक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासन आता प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे शासनाने कोरोनालस घेण्यासाठी शिक्षकांसह सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही ५ सप्टेंबर ची मुदत दिली आहे....

दरम्यान, कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यामुळे शासनाने प्रथम आठवी ते बारावी पर्यतंच्या शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. नाशिक महानरपालिका (Nashik Municipal Corporation) क्षेत्र वगळता जिल्ह्यात जवळपास ७० ते ८० टक्के शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाली आहेत. शाळा महाविद्यालयांमध्ये रूजू होताना शिक्षणं विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीसह कोरोना लसीकरण बंधनकारक (Compulsion of Covid Vaccination) केले आहे.

त्यानुसार, आता राज्यशासनाने शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाचे दोन्ही डोस सक्तीचे करीत ५ सप्टेंबर डेडलाईन(5 September deadline for teachers vaccination) दिली आहे. त्यासदर्भातील आदेश शिक्षणाधिकार्यांनी संबंधित शाळांना दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com