राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे; हे आहे कारण...

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे; हे आहे कारण...
कालच्या आंदोलनातील छायाचित्र

नाशिक | प्रतिनिधी

शहरात जमावबंदी असतानाही महागाई विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष तसेच इतर अशा ७० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

राष्ट्रवादीचे शहरध्यक्ष रंजन ठाकरे, राज्य कार्यकारणी सदस्य दिलीप खैरे, अंबादास खैरे, बाळासाहेब कर्डक, दुसर्‍या आंदोलनात गजानन शेलार, सागर चौथेपाटील, शरद महाले, शिवाजी चौधरी यांच्यासह सुमारे ७० पदाधिकार्‍यांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केंद्र शासनाच्या निष्क्रियतेमुळे देशभरात इंधन दरवाढ होत असल्याने महागाई वाढत आहे. याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.

याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास उपनिरिक्षक बैरागी करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com