
नाशिक | प्रतिनिधी Nashik
अभिनेत्री कंगना राणावतने (Bollywood Actress Kangana Ranaut) ‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले.’ असे वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. या वक्तव्यामुळे संपूर्ण देशासह स्वातंत्र सैनिकांचा अपमान केल्याने त्यांच्या विरोधात कलम १५३ (अ) कायद्या अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आज नाशकात करण्यात आली आहे...
याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP Youth Congress) शहराध्यक्ष अंबादास खैरे व त्यांच्या शिष्टमंडळाने पंचवटी पोलीस ठाण्याचे (Panchvati Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे (PI Dr Sitaram Kolhe) यांना दिले. सर्व पुराव्यांच्या आधारावर पुढील दोन दिवसात कंगनावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी खैरे यांना सांगितले.
कंगना राणावत हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहे. तिला चित्रपट सृष्टीतील कामगिरीबद्दल नुकतेच पद्मश्री (padma shri award) या बहुमानाने गौरविण्यात आले.
या गौरवानंतर तिने एक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने "देशाला पूर्वी मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती,देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ रोजी मिळाले." अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे, राणोत यांच्या या वक्तव्यामुळे देशाचा, देशातील प्रत्येक नागरिकाचा आणि त्याहून महत्वाचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हजारो स्वातंत्र्यसेनानींचा अपमान झाला झाले.
या स्वातंत्र्यसेनानींनी देशासाठी दिलेले बलिदान राणोत यांच्या एका वक्तव्यामुळे कवडीमोल ठरले आहे, देशाचा स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न कंगनाने या वक्तव्यातून केला आहे.
त्यामुळे कंगनावर १५३(अ) तसेच देशद्रोहासाठी अन्य जी योग्य कलमे असतील, त्यानुसार गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे व शिष्टमंडळाने दिले. सर्व पुराव्यांच्या आधारावर पुढील दोन दिवसात कंगना राणावत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी खैरे यांना सांगितले.
याप्रसंगी बाळा निगळ, जय कोतवाल, संतोष जगताप, सागर बेदरकर, निलेश भंदुरे, रामदास मेदगे, डॉ. संदीप चव्हाण, किरण पानकर, संतोष गोवर्धने, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, गणेश गरगटे, भालचंद्र भुजबळ, रोहित जाधव, अमर गोसावी, अमनदीप रंधावा, बजरंग गोडसे आदींसह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.