मुर्तीची नको गणेश उत्सवाची उंची वाढवा
नाशिक

मुर्तीची नको गणेश उत्सवाची उंची वाढवा

जिल्हा प्रशासनाचे आवाहन : गर्दी टाळून उत्सव साजरा करा

Kundan Rajput

नाशिक । प्रतिनिधी

करोना संकटाच्या पार्श्वभुमीवर यंदाच्या गणेशोत्सव साध्य‍ा पध्दतीने साजरा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्याबाबत राज्य श‍ासनाने देखील सुचना प्रसिध्द केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक मंडपांमध्ये चार फुटांपेक्षा मुर्तीची उंची जास्त नसावी. घरगुती गणेश मुर्तीची उंची दोन फुट असावी...

गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. विशेषकरुन सभा मंडपात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी , असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता नाशिककरांनी अटीशर्तींचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाप्रशासनाकडून करण्यात आले आहे.

करोनाचे संकट यंद‍ा गणेशोत्सावर पहायला मिळत आहे. गणेशोत्सवात होणार्‍या गर्दीमुळे करोना संसर्ग होण्याचा धोका आहे. ते बघता जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव साध्या पध्दतिने साजर्‍या करावा अशा सुचना दिल्या आहेत.

माती अथवा प्लास्टर आॅफ पॅरिस मुर्ती ऐवजी घरगुती धातुच्या मुर्तीची पूजा करावी. गणेश मुर्तीचे घरातच विसर्जन करावे. घरी शक्य नसल्यास कृत्रिम तलावात विसर्जन करावे. मंडळांनी जाहिरात व भपकेबाजपणा करणे टाळावे.

करोनाची परिस्थिती लक्षात घेता सामाजिक संदेश देऊन जनजागृती करावी. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी रक्तदान, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले जावे. करोनासोबत पावसाळ्यात डेंगू, मलेरिया या साथीच्या रोगराई लक्षात घेता स्वच्छतेचा संदेश दयावा.

आरती, पूजापाठ आदी धार्मिक सोहळे साजरे करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. गणपती सभा मंडपात वेळोवेळि निर्जंतुकिकरण केले जावे. मंडपात थर्मल स्कॅनिंग व्यवस्था केली जावी. सोशल डिस्टन्सचे पालन केले जावे.

स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन करावे. गणेश आगमन व विसर्जन मिरवणुक टाळावी. महापालिका, सामाजिक संस्था व मंडळांनी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करावी, असे स्पष्ट निर्देष देण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आॅनलाईन दर्शनाची व्यवस्था

सार्वजनिक व विशेषकरुन मानाचे गणपती मंडळानी गर्दी टाळण्यासाठी भाविकांसाठी आॅनलाईन दर्शनाची फेसबुक, युटयूब याद्वारे व्यवस्था करावी. जेणेकरुन गर्दी टाळता येइल व करोनाचा संसर्गाचा धोका टाळता येईल, अशा सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे व दिलेल्या अटीशर्तींचे उल्लंघन होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. गर्दी टाळावी जेणेकरुन करोना संसर्ग धोका टाळता येईल. न्यायालयाने व राज्यशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
सुरज मांढरे, जिल्हाधिकारी
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com