'सीएनजी' हवाय? आदल्या दिवशी नंबर लावा; पंपांवर लांबच लांब वाहनांच्या रांगा

'सीएनजी' हवाय? आदल्या दिवशी नंबर लावा; पंपांवर लांबच लांब वाहनांच्या रांगा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात सीएनजीचा (CNG) मोठा तुटवडा भासत आहे. मागणी आणि पुरवठा याचे व्यस्त गणित असल्याने सीएनजी पंपावर (CNG Gas) लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेक ग्राहक आदल्या दिवशीच पंपाच्या बाहेर आणि रस्त्याच्या कडेला नंबर लावताना दिसून येत आहेत... (CNG Shortage in Nashik)

काही वाहन चालक रात्रीच वाहन रांगेत लावून तेथेच झोपतात. पंप सकाळी सहा वाजता सुरू करण्याचाही प्रकार सुरु आहे.

सीएनजी वाहून आणणारे ट्रक रात्री येऊन थांबतात. पंप मात्र सकाळी सहा वाजता सुरू होतात. काही पंप सुरू होण्यासाठी पावणे सात वाजतात.

सुमारे तीन ते चार तास प्रतीक्षा केल्यानंतर सीएनजी मिळते. पेट्रोल आणि डिझेल यांच्या भावाने उच्चांक गाठल्याने नाशकात सीएनजी गाड्या खरेदी करण्याकडे कल आहे. त्याचबरोबरीने जुन्या गाड्या मोठ्या प्रमाणात सीएनजी वर केल्या जात आहेत.

त्यामुळे नाशिकमध्ये पंप वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. जे सीएनजी पंप सुरू आहेत तेथे २४ तास सीएनजी पुरवठा करणे अत्यावश्यक आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com