नव्या-कोऱ्या सीएनजी बसमधून नाशिककरांची पहिली सफर; नऊ बसेसची फ्री ट्रायल यशस्वी

तिकीटही दिले, बसचे टायमिंगही समजले, शहरात नंबरवरून ओळखले जाणार मार्ग
नव्या-कोऱ्या सीएनजी बसमधून नाशिककरांची पहिली सफर; नऊ बसेसची फ्री ट्रायल यशस्वी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर बससेवेचा (Nashik city bus service) तिढा अखेर सुटला असून लवकरच नव्या कोऱ्या सीएनजी बसेस (NMC CNG Buses) रस्त्यावर धावताना दिसून येणार आहेत. नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या नवीन बसेसचे आज प्रात्यक्षिक शहरातील काही मार्गांवर घेण्यात आले. यावेळी प्रवाशांना मोफत सेवा दिवसभर देण्यात आली. नव्या-कोऱ्या आणि अत्याधुनिक धाटणीच्या या बसेसमधून नाशिककरांचा प्रवास सुखद झाला, प्रवाशांनी मोठ्या आनंदात या बससेवेचे स्वागत केले...

पुढील दोन दिवस या बसेसचे तांत्रिक ट्रायल (Technical trial run) पार पडणार आहे. हे या बसेसचे दुसरे ट्रायल आहे. याआधीच्या ट्रायलमध्ये आलेल्या त्रुटी दूर करून आज या बसेस पूर्ण क्षमतेने कुठलीही तांत्रिक अडचण न येता नाशिकरोड, पाथर्डी, बोरगड, तपोवन, पंचवटी, सातपूर या उपनगरांमध्ये धावल्या. (Nashikroad, Pathardi, Borgad, Tapovan, Panchvati & Satpur)

आज सकाळी आठ वाजता ट्रायल रनला सुरुवात झाली. सव्वाआठ वाजता अत्पोवान व नाशिकरोड बसडेपोमधून ट्रायल रनला (Nashikroad Bus depot trial run) सुरुवात झाली. तपोवन डेपोतून पाच तर नाशिकरोड डेपोतून चार बस एकाच वेळी रस्त्यावर उतरविण्यात आल्या. दोन्ही ठिकाणाहून एकूण नऊ मार्गांवर या बसेस सायंकाळी चार वाजेपर्यंत धावल्या. यानंतर या बसेस तपोवन येथील मुख्य डेपोमध्ये परतीच्या मार्गी आल्या.

दिवसभराच्या या प्रवासात सीएनजी आणि डीझेल बसेसचा (CNG & Diesel buses) समावेश होता. पहिल्यांदाच प्रवाशी या बसमध्ये घेण्यात आले, विशेष म्हणजे फ्री ट्रव्हलचे तिकीटदेखील या प्रवाशांना देण्यात आले. ट्रायल रनच्या माध्यमातून संगणकीय प्रणालीसह जीपीएस यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. तिकीट मशीन, संगणकीय तपासणी आदी बाबी यादरम्यान तपासण्यात आल्या.

गेल्या वेळच्या ट्रायलमध्ये आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभरात कुठलीही अडचण आली नाही. पहिल्यांदाच प्रवाशांना घेऊन बस मार्गस्थ झाल्या होत्या. रीतसर प्रवाशाला तिकीट देण्यात आले. बसेसच्या तांत्रिक तपासण्या झाल्या. आणखी दोन दिवस हे ट्रायल सुरु राहणार आहे.

मिलींद बंड, महाव्यवस्थापक, वाहतूक

सीएनजीचा तुटवडा भासणार नाही

नाशिकमधील बससेवेसाठी सीएनजीचा तुटवडा अजिबात भासणार नाहीये. कारण, एमएनजीएल (MNGL) स्वतंत्र टंकर बससेवेसाठी पुरवणार आहे. सीएनजी बसेस भरण्याची वेळ वेगळी आहे, त्यामुळे शहरातील इतर वाहने आणि बसेस यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही.

सीएनजी बसेसमध्ये १८० किलो गस बसतो. सध्याच्या स्थितीत १०० किलो गस पुरेसा ठरणार आहे. साधारण साडेचार ते पाच किमी प्रती किलो याप्रमाणात सरासरी बस धावणार आहेत. दररोज २०० किमी अंतर एक बस कापणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत गसचा कुठलाही तुटवडा या बसेसला भासणार नाही.

या मार्गावर झाला ट्रायल रन (Trail run routs)

तपोवन डेपो (Tapovan Depot)

मार्ग क्रमांक १०१ - तपोवन ते बारदान फाटा (सीबीएस, सिव्हील हॉस्पिटल, सातपूर अशोकनगर मार्गे)

मार्ग क्रमांक १०३ - तपोवन ते सिम्बोयसीस कॉलेज (सीबीएस सिव्हील, पवननगर उत्तमनगर मार्गे)

मार्ग क्रमांक १०४ - तपोवन ते पाथर्डी गाव (द्वारका, नागजी, इंदिरानगर, वनवैभव)

मार्ग क्रमांक १५२ - सिम्बोयसिस कॉलेज ते बोरगड (शिवाजी चौक लेखानगर महामार्ग म्हसरूळ)

मार्ग क्रमांक १५६ - तपोवन ते भगूर (द्वारका, बिटको, देवळाली कॅम्प)

नाशिकरोड डेपो (Nashikroad Depot)

मार्ग क्रमांक २०२ - नाशिकरोड ते बारदान फाटामार्गे द्वारका, कॉलेज रोड, सातपूर, व्हीआयपी, कार्बन नका

मार्ग क्रमांक २०७ - नाशिकरोड ते अंबड गावमार्गे द्वारके महामार्ग लेखानगर गरवारे,

मार्ग क्रमांक २५७ - नाशिकरोड ते निमाणीमार्गे, जेलटाकी, सैलानी बाबा, नांदूरगाव, नांदूरनका, तपोवन

मार्ग क्रमांक २७३ - नाशिकरोड ते तपोवनमार्गे बिटको, द्वारका, शालीमार, सीबीएस, पंचवटी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com