मनोरुग्णाची सटकली; जिल्हा रुग्णालयात राडा

मनोरुग्णाची सटकली; जिल्हा रुग्णालयात राडा

नाशिक | Nashik

जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) मनोरुग्णाने धुमाकूळ घालत उपचार घेत असलेल्या रुग्णांसह वार्डबॉयला मारहाण केल्याची घटना आज (दि.15) रोजी घडली..

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयात पहाटे पावणेचार वाजता दाखल झालेल्या अज्ञात मनोरुग्णावर उपचार सुरू असताना त्याने वार्डबॉय आणि आजूबाजूच्या रुग्णांना मारहाण केली. सुदैवाने यात कोणालाही गंभीर इजा झाली नाही.

चार ते पाच सुरक्षा रक्षक, दोन मामा आणि वार्डबॉय यांनी संबंधित मनोरुग्णाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने हाताला पायाला बांधलेल्या दोरीने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.

हा मनोरुग्ण कोणालाही आवरला न गेल्याने इंजेक्शन देऊन त्याला शांत करण्यात आले. याबाबत डॉ. जेजुरकर उपचार करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com