नाशिक । प्रतिनिधी

यंदा करोनाच्या सावटाखाली नाशिक शहरात उत्तर भारतीयांनी छटपुजा सण पारंपारिक पध्दतीने साजरा केला. या पार्श्वभूमीवर रामकुंडालगत गोदाकाठावर छटपुजेस बंदी घातल्यामुळे या परिसरात शुकशुकाट दिसुन आला. गुरुवार (दि.19)पासुन सुरू झालेला सण उद्या (दि.21) सकाळी संपणार आहे.

नाशिक शहरात दक्षिण गंगा गोदावरी नदीकाठी दरवर्षी हजारो उत्तर भारतीय महिला छट पूजा हा धार्मिक सण साजरा करतात. मात्र यंदा यासणावर करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडुन सार्वजनिक जागी छट पुजेस बंदी घालण्यात आली होती.

गोदाकाठावर दरवर्षी छटपुजा करणार्या 50 ते 60 हजार महिलांना घरातच छट पुजा करावी लागली. छट पुजेस गुरुवार पासुन प्रारंभ झाल्यानंतर उत्तर भारतीय महिलांनी पारंपारिक पद्दतीने सर्वकामना, समृध्दी, संतती पूर्तीसाठी सूर्योपासना आणि निर्जला व्रत करत ही पुजा केली. महिलांनी आज घराच्या अंगणात सुर्यांची पुजा करीत घरात छटपुजा केली.

शहरातील मोठ्या इमारतीत राहणार्या उत्तर भारतीय महिला घरातील टेरेसवर किंवा मोकळ्या जागी येऊन सर्यपुजा केली. गोदावरी नदीच्या काठावर एकत्रीत जमण्यास बंदी घालण्यात आली होती. याठिकाणी पुजा होऊ नये म्हणुन गोदाकाठालगत बॅरेकेटींग लावण्यात येऊन बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज शहरात छटपुजा सण साजरा करण्यात आला.