नाशिक | प्रतिनिधी

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या भामट्याने ओरबडल्याची घटना त्रिमूर्ती चौकात घडली...

इंदूमती प्रमोद गोळे (६०, रा. मुक्ताई सोसायटी, कामटवाडे) या शुभम पार्क, उत्तमनगर येथून दिव्या ॲडलॅबच्या दिशेने जात होत्या.

त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने गोळे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी लांबविली. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शेवाळे अधिक तपास करत आहेत.