सेन्ट्रल जेलमध्ये कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सेन्ट्रल जेलमध्ये कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

येथील मध्यवर्ती कारागृहा (Nashiroad Central Jail)त एका कैद्याने कारागृहात असलेल्या कडू लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Suicide Attempt) केल्याची घटना घडली. मात्र वेळीच ही घटना कारागृह कर्मचारी व इतर कैद्याच्या लक्षात येताच त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले....

दिपक अंबादास पोकळे (वय 28) असे या कैद्याचे नाव असून तो मुळचा राहाता (Rahata) येथे राहणार आहे. त्याच्यावर राहाता पोलीस स्टेशन (Rahata Police Station) अंतर्गत मोका व आर्म एक्ट अंतर्गत गुन्हे असल्याने येथील मध्यवर्ती कारागृहात आहे.

दरम्यान, पोकळे याला त्याच्या जेल बदली संदर्भात मूळ कारागृहात जायचे आहे. अशी त्याची मागणी आहे. परंतु, ही मागणी मान्य होत नसल्याने पोकळे याने कारागृहात असलेल्या कडुनिंबाच्या झाडावर झाडाचे फांदीस बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सदरची बाब कारागृहातील कर्मचाऱ्यांना लक्षात येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान या घटनेप्रकरणी कारागृह शिपाई काकाजी पंडित ठोके यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात (Nashikroad Police Station) तक्रार दाखल केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नायदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com