बैलगाडा शर्यत : चौकात उधळला गुलाल, फटाक्यांची आतषबाजी अन् बरंच काही...

बैलगाडा शर्यत : चौकात उधळला गुलाल, फटाक्यांची आतषबाजी अन् बरंच काही...

चिंचखेड | वार्ताहर chinchkhed

बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये जल्लोष करण्यात आला. चिंचखेड येथील बैलगाडा प्रेमींनी गुलाल तसेच फटाक्यांची आतषबाजी करत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले....

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुनील मातेरे, सरपंच रावसाहेब पाटील, ग्रामसेवक तांबे, दशरथ संधान, सोमनाथ मातेरे, बबन संधान, तानाजी संधान,दत्तात्रय संधान, त्र्यंबकराव संधान खंडेराव संधान,प्रभाकर पाटील,माधव पवार, सुधाकर संधान,रायबा पाटील,बापू सोनवणे,विशाल संधान,पुष्कर बोरस्ते,सुभाष धुळे,अमोल पवार, नामदेव संधान, तसेच चिंचखेड ग्रामपंचायत प्रशासनातर्फे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालायने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्धी लढाई पार झाली आहे. आता भिर्र होणार, फक्त सर्वांनी नियम पाळून शर्यती घ्याव्यात.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती.

सरकारी पक्षाचा युक्तीवाद बुधवारी पूर्ण झाल्यानंतर आज पेटाच्यावतीने बाजू मांडण्यात आली. मुंबई हायकोर्टाने २०१७ मध्ये बैलागाडा शर्यतीवर बंदी घातली होती. राज्य सरकारने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com