महागड्या मद्याचा मोठा साठा जप्त; घाट रस्त्याने होतेय अवैध वाहतूक

गांधी सप्ताहाच्या सुरुवातीला पावणे तेरा लाखांचा मुद्देमाल आढळून आल्याने खळबळ
महागड्या मद्याचा मोठा साठा जप्त; घाट रस्त्याने होतेय अवैध वाहतूक

नाशिक। प्रतिनिधी Nashik

अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन गांधी सप्ताह सुरू करण्यात आलेला आहे. या सप्ताहाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात जव्हार घाटात सापगाव फाटा शिवार (Trimbakeshwar Taluka javhar ghat area sapgaon phata) या ठिकाणी तपासणी करीत असताना इनोव्हा गाडीमध्ये पावणे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे....

दरम्यान, उत्पादन शुल्क निरीक्षक (Police Inspector Excise Department) जयराम जाखेरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी सापगाव फाटा (Sapgaon Phata) शिवारात नाकाबंदी केली. त्यामध्ये वाहने तपासणी करत असताना टोयोटा कंपनीची इनोव्हा कार आणि त्यामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेले विदेशी मद्य आढळून आले. यावेळी अंधाराचा फायदा घेत चालक पसार झाला. त्याच्यावर अज्ञात फरार म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विदेशी मद्य मध्ये ब्लेंडर्स प्राईड व्हिस्कीच्या ७५० मि.ली.क्षमतेच्या ६० सिलबंद बाटल्या, इम्प्रियल ब्लु व्हिस्कीच्या ७५० मि.ली. क्षमतेच्या ४२० सिलबंद बाटल्या मिळुन आल्या आहे. हा मद्यसाठा आणि चारचाकी वाहन असा एकूण १२ लाख ८३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई भरारी पथक क्र .१ चे निरीक्षक जयराम जाखेरे, दुय्यम निरीक्षक अरुण सुत्राधे, माधव तेलंगे, जवान सुनिल दिघोळे, धनराज पवार, एम.पी.भोये, राहुल पवार आणि अनिता भांड यांचे पथकाने पार पाडली असुन पुढील तपास दुय्यम निरीक्षक यशपाल भि.पाटील करीत आहेत.

Related Stories

No stories found.