Video : शेतकरी आंदोलनास सहा महिने पूर्ण; केंद्र सरकारचा नाशकात निषेध

Video : शेतकरी आंदोलनास सहा महिने पूर्ण; केंद्र सरकारचा नाशकात निषेध

नाशिक | प्रतिनिधी

दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज १८० दिवस म्हणजेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. गेली सहा महिने आंदोलन सुरु असतानाही सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे नाशिकमधील बहुजन शेतकरी संघटना, किसान सभा यांनी सरकारचा निषेध करत काळे झेंडे दाखवले...

बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने आज केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध दिन म्हणून पाळण्यात आला.

शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करा याबाबत घोषणाबाजी शेतकऱ्यांनी केली. हमी भावाचा कायदा लागू करा यासाठी केन्द्र शासनाचा विरोध, यावेळी अध्यक्ष अशोक खालकर, रमेश औटे, सुदाम बोराडे, मधुकर सातपुते, शांताराम भागवत, नंदू सोनवणे आदी.

दुसरीकडे आज किसान सभा चांदवड तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कमी नागरिकांच्या उपस्थितीत सरकारचा निषेध याप्रसंगी करण्यात आला.

यावेळी जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भास्कर शिंदे, उपाध्यक्ष सुखदेव केदारे, चांदवड तालुका अध्यक्ष किरण डावखर आदींची उपस्थिती होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com