फसवणूकप्रकरणी भूमाफिया बाळासाहेब कोल्हेला अटक

फसवणूकप्रकरणी भूमाफिया बाळासाहेब कोल्हेला अटक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या काही महिन्यांपूर्वी जागेच्या वादातून रमेश मंडलिक (वय ७०) (Ramesh Mandalik murder case) यांचा खून केल्याप्रकरणी भूमाफियांची टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. या टोळीवर पोलीस आयुक्तांनी (Police commissioner mokka) मोक्कानुसार कारवाई केली. टोळीतील संशयित बाळासाहेब कोल्हे (Balasaheb Kolhe) यास न्यायालयाने जामीन मंजूर करत सुटका करून आठ दिवस उलटत नाही तोच त्याच्याविरुद्ध पुरावा मिळाल्याने सातपूर पोलिसांनी पुन्हा त्यास सोमवारी (दि.१३) अटक केली आहे.... (balasaheb kolhe arrested)

दरम्यान, आनंदवली (Anandwali) येथे मंडलिक यांच्या खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी सुमारे २२ संशयितांची टोळी गजाआड केली आहे. या भूमाफियांच्या टोळीचा मास्टरमाइन्ड रम्मी राजपूतलाही (Rammi Rajput) पोलिसांनी अटक केली.

टोळीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत करत आर्थिक रसद पुरविण्याचा ठपका संशयित कोल्हेविरुद्ध ठेवण्यात आला आहे. गेल्या मंगळवारी न्यायालयाने जिम्मी राजपुत (Jimmy Rajput) व कोल्हे यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता. त्यामुळे कारागृहातून कोल्हे यांची सुटका झाली होती. यानंतर सातपूर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध दाखल जमीन फसवणुकीच्या एका गुन्ह्यात पुन्हा अटक केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन शाखेतील अव्वल कारकून राहुल काळे (४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, कोल्हेविरुद्ध पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच मूळ जमीन मालकाच्या नावाने बनावट दस्तऐवज तयार करत शासनाची व जमीन मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यात सातपूर पोलिसांना कोल्हे हवा होता. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत त्याच्याविरुद्ध पुरावे पोलिसांच्या हाती लागले. यामुळे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर (Police Inspector Satish Ghotekar) यांनी कोल्हे यास सोमवारी पुन्हा अटक केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com