Nashik News : युवा शेतकऱ्याने साजरा केला हटके बैलपोळा; सर्जा-राजासह कापला केक

Nashik News : युवा शेतकऱ्याने साजरा केला हटके बैलपोळा; सर्जा-राजासह कापला केक

नाशिक | Nashik

बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) पश्चिम पट्ट्यात असलेल्या मोरकुरे या आदिवासी गावातील एका युवा शेतकऱ्याने बैल पोळ्याच्या दिवशी आपल्या लाडक्या बैलजोडीचा केक कापून बैलपोळा (Bail Pola) साजरा केला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला असून या युवा शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Nashik News : युवा शेतकऱ्याने साजरा केला हटके बैलपोळा; सर्जा-राजासह कापला केक
Accident News : पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा ढूमसे असे या युवा शेतकऱ्याचे नाव असून त्याने आज बैलपोळा सणाच्या दिवशी आपल्या बैलजोडीचा धुमधडाक्यात आणि वाजतगाजत केक कापून बैलपोळा साजरा केला. त्याच्या या कृतीची मोरकुरे (Morkure Village) गावासह बागलाण तालुक्यात चांगलीच चर्चा सुरु आहे.

Nashik News : युवा शेतकऱ्याने साजरा केला हटके बैलपोळा; सर्जा-राजासह कापला केक
Maratha Reservation : मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट; म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत आम्ही...

दरम्यान, शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे वेगळेच स्थान असते. घरातील एका सदस्यांप्रमाणे शेतकरी आपल्या जनावरांची काळजी घेत असतो. त्यांच्या आहाराकडे, आरोग्याकडे लक्ष्य देत असतो. त्यामुळे बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी (Farmer) नेहमीच प्रयत्न करत असतात. याचाच प्रत्यय बागलाण तालुक्यातील या शेतकऱ्याच्या कृतीतून दिसून आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Nashik News : युवा शेतकऱ्याने साजरा केला हटके बैलपोळा; सर्जा-राजासह कापला केक
Nashik Crime News : लाचखोर कनिष्ठ लिपिक ताब्यात
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com