ढगाळ वातावरणामुळे द्राक्षशेतीवर होणार वाईट परिणाम

ढगाळ वातावरणामुळे द्राक्षशेतीवर होणार वाईट परिणाम

पालखेड मिरचिचे | वार्ताहर

दोन दिवसापासून नाशिक जिल्ह्यात सुरु असणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष पिकावर मोठा परिणाम होणार आहे. या वातावरणामुळे गर्भधारणा होण्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी माहिती द्राक्ष सल्लागार अमोल जाधव यांनी दिली आहे....

नाशिक जिल्हा द्राक्ष पंढरी म्हणुन ओळखला जातो. सध्या एप्रिल छाटणीनंतर द्राक्षबागांची काडी विरळणी व सबकेन अवस्थेत आहेत. वादळी वारे ढगाळ वातावरण यामुळे द्राक्ष वेलीच्या फांदया तुटून पुढील हंगाम वाया जाऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहेत.

वादळी वारा आणि तूरळक पाऊसमुळे पुरेशा प्रमाणात सुर्यप्रकाश नसल्याने द्राक्षकाडी परिपक्व होण्यास मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो परिणामी द्राक्ष उत्पादन खर्च वाढू शकतो.

सध्या दोन दिवसापासून वादळी वारे व ढगाळ वातावरण यामुळे द्राक्ष गर्भधारणेवर परिणाम होऊन द्राक्ष हंगामा वाया जाऊ शकतो. कारण, सध्या द्राक्ष पिकाला उष्ण वातावरण गरजेचे आहेत. जास्त काळ ढगाळ वातावरण हे धोक्याचे आहेत

अमोल जाधव द्राक्षशेती, सल्लागार, कुंभारी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com