अव्वाच्या सव्वा बिल आकारणी; महापालिकेने वाचवले साडेपाच कोटी

अव्वाच्या सव्वा बिल आकारणी; महापालिकेने वाचवले साडेपाच कोटी

नाशिक | प्रतिनिधी

रुग्णालयांमधून रुग्णांच्या नातेवाइकांकडून जास्त बिल आकारणी होत असल्याच्या भरपूर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ऑडिटर याची नेमणूक केली होती...

सामान्य नागरिकांनी याचे स्वागत केले होते. आतापर्यंत या ऑडिटरने एकूण ५ कोटी ५५ लाख ७९ हजार १०९ रुपयांचे बिल कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शहरातील शासकीय रुग्णालयाप्रमाणेच खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली.

काही खासगी रुग्णालयांनी करोना रोगाची संधी साधत दाखल झालेल्या रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी सुरू केली.

शासनाच्या नियमाप्रमाणे ठरवून दिलेल्या दरानुसार बिले आढळून न आल्याने प्रत्येक खासगी रुग्णालयाच्या कोविड रुग्णालयाचे बिल तपासणीसाठी ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली.

नेमण्यात आलेल्या ऑडिटरकडून बिल तपासणीनंतर तफावत आढळून आल्यास ती रक्कम रुग्णाला परत करण्यासंदर्भात संबंधित रुग्णालयांना सूचनाही देण्यात आल्या.

त्यानुसार आतापर्यंत मनपा ऑडिटरकडून २४ हजार ७६९ बिलांची तपासणी करण्यात आली असून, या बिलांपोटी ५ कोटी ५५ लाख ७९ हजार १०९ रुपयांची तफावत आढळून आल्याने ही रक्कम संबंधित रुग्णांना परत करण्यात आली आहे.

मेडिक्लेमसंदर्भातील बिलांची तपासणी करण्यात येत नसून, शासनाच्या कोट्याप्रमाणे ठरवून दिलेल्या दरानुसार आकारण्यात आलेल्या बिलासंदर्भात ही तपासणी करण्यात येते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com