फुलेनगर येथे महिलेवर प्राणघातक हल्ला

फुलेनगर येथे महिलेवर प्राणघातक हल्ला

पंचवटी | वार्ताहर

मागील भांडणाची कुरापत काढत फुलेनगर वैशालीनगर परिसरात राहणाऱ्या हिना राजू शेख या महिलेवर एकाने धारदार कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी हेमंत गांगुर्डे या संशयिताला अटक केली आहे...

याबाबत हिना शेख यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गांगुर्डे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी मध्यरात्री दिड वाजता संशयित गांगुर्डे हा शेखच्या घराजवळ आला व आरडाओरडा करू लागला.

त्यावेळी शेख यांनी तू तमाशा का करतो? असे म्हटल्याचा राग गांगुर्डेला आला. त्याने शिवीगाळ करत हातातील धारधार कोयत्याने शेख यांच्या हातावर वार केले व त्यात शेख जखमी झाल्या.

या घटनेनंतर पोलिसांनी संशयित गांगुर्डे याच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com