मध्यस्थी करणाऱ्यांनो सावधान! भांडण सोडविणाऱ्यावरच प्राणघातक हल्ला

मध्यस्थी करणाऱ्यांनो सावधान! 
भांडण सोडविणाऱ्यावरच प्राणघातक हल्ला
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

सातपूर | प्रतिनिधी Satpur

अशोकनगरच्या जाधव संकुल (Jadhav Sankul Ashok Nagar Nashik) परिसरात शिवसैनिकासह चौघांवर संतोष ढमाळ नामक इसमाने (knife attack of four people) चाकूचे वार करत प्राणघातक हल्ला केला. ऐन भाऊबीजेच्या (Bhaubij Diwali) दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातून चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी ताबडतोब कारवाई करीत हल्लेखोरास अटक केली आहे....

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व भाऊसाहेब भिकाजी जाधव यांच्या फिर्यादीनुसार, हल्लेखोर संतोष ढमाळ याचे त्याचा भाऊ संजय ढमाळ याच्याशी भांडण सुरू होते.

त्याच्या घराशेजारी राहणार्‍या जाधव नामक व्यक्तीने मध्यस्थी करत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला.

याचा राग आल्याने हल्लेखोराने जाधव यांचा मुलगा सागर जाधव याच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर काही वेळाने दूध घेण्यासाठी दुकानात गेलेल्या राजू गवळी याच्यावर हल्ला केला.

शिवसैनिक श्याम फर्नांडिस याच्यावरही हल्ला केला. फर्नांडिस यांनी जखमी स्थितीत पोलिस ठाणे गाठून हल्ल्याबाबतची माहिती दिली.

दरम्यान या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात (Satpur Police Station) संतोष मानसिंग ढमाळ (46) याच्या विरुद्ध भादंवि कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सायंकाळी जाधव संकुलमधील अहिल्याबाई चौक परिसरात (Ahilyabai holkar chauk) ही घटना घडली. हल्लेखोर हा सराईत गुन्हेगार असून, दोन वर्षांपूर्वीही त्याने एकाचा डोळा फोडला असल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास वपोनि किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com