शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध

उपमुख्यमंत्री अजित पवार
शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध
उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक | प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार गुरवारी नाशिक दौ़र्‍यावर आहेत. सकाळी आठला त्यांंचे ओझऱ विमानतळावर आगमन झाले. यानंतर त्यांनी साडे आठवाजता सय्यद पिंप्री येथेे क्रीडा संकुलास भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त केला. शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच, शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक संपविण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

देवळाली मतदार सघातील विविध विकास कामांचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अजित पवार बोलत होते. यानंतर साडे नऊला त्यांचे उदोजी मराठा बाडींग कॅम्पस येथे आममन झाले. राजर्षी शाहु महाराज पॉलीटेक्नीक महाविद्यालयाच्या नुतन इमारतीचे उदघाटन त्यांच्या हस्ते हाईेल.

तसेच कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर नाशिक या महविदद्या्लयाचे शरदचंद्र पवार कॉॅलेज ऑफ आर्कीटेक्चर नामकरण करण्यासाठी त्यांचा ताफा पुढे जाणार आहे.

यापूर्वी, आडगाव येथील शेतकऱयांना जिल्हा बँकेतर्फे कर्जपुरवठा करतांना होणार्‍या अन्यायाविरुध्द दाद मागण्यासाठी आडगाव सोसायटीचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आडगावकरांचे शिष्टमंडळ अजित पवार यांना सय्यद पिंप्रीत भेटले.

यावेळी कर्जास पात्र सभासद शेतकर्यर्ंंना शंभर टक्के कर्जपुरवठा करावा, जिल्हा बँकेतील सभासद शेतकऱ्यांच्या ठेवी परत मिळाव्यात अशा मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com