शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या ११० कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

तीन वर्षात कृषी विभागाची कारवाई
शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या ११० कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द
कृषी सेवा केंद्र

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शेतकर्‍यांची फसवणूक (Farmer Cheating) करुन त्यांची आर्थिक लूट करणार्‍यांवर कृषी सेवा केंद्रावर (Agro product center) जिल्हयात कारवाई सुरु आहे. गेल्या तीन वर्षात नाशिक जिल्हयात ११० खते, बियाणे, किट्कनाशकांची विक्री करणार्‍यांवर कृषी विभागाने कारवाई करत त्यांचे परवाने रद्द केले आहेत. चालू वर्षातही महिन्याभरात १४ दुकानदारांचे परवाने रद्द केले आहेत....

नाशिक जिल्हयात ८ हजार ७०० कृषी सेवा केंद्र आहेत, यात २ हजार ५८३ बियाणे, ३ हजार २७२ किट्कनाशके, ३ हजार ३२ खतांची दुकाने आहे. तर गेल्या वर्षी ८३८ कृषी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षापासून विक्रेते शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. खताचा साठा करुन ठेवणे, खत ट्ंचाइ करणे, नंतर वाढीव किंमतीत ते विकणे, शेतकर्‍यांना बिले न देणे याप्रकरणी कृषी सेवा केंद्रावर कारवाइचा बड्गा उगारण्यात आला आहे.

जिल्हयातील काही विक्रेते अद्यापही फसवणूक करीत असून त्यांच्यावर कारवाइची मागणी शेतकर्‍यांकडून केली जातेे आहे. खरीप हंगामाचे कृषी विभागाने नियोजन केले असून जिल्हयातील परिस्थितीकडे अधिकारी लक्ष ठेवून आहेत, नाशिक विभागासह जिल्हयात २०१९ मध्ये कृषी विक्रेत्यांवर कारवाइचा सपाटा लावला होता, विशेषत: जे मोठे खत विक्रेते आहेत, त्यांच्यावर कारवाइ झाल्याचे दिसून आले होते.

दरम्यान नाशिक जिल्हयात हैद्राबाद व मुंबइ येथून अवैध किट्कनाशकांची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आले आहेत. दरम्यान जिल्ह्यामध्ये कृषी विभागाकडून केलेल्या कारवाइमुळे फसवणूक करणार्‍या विक्रेत्यांचे धाबे द्णानल्याचे चित्र आहे. कृषी विक्री केंद्र दुकानदारांनी शेतकर्‍यांना खत खरेदेची बिलाची पक्की पावती द्यावी, दुकानासमोर भाव फलक, साठा फलक लावण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

शेतकर्‍यांंची फसवणूक होऊ नये याकरिता कृषी विक्रेत्यांनी खताची मूळ किंमत त्याच किंमतीमध्ये शेतकर्‍यांना द्यावी, दूकानासमोर भावफलक, साठा फलक यांची माहिती असावी, शेतकर्‍याची फसवणूक होत आहे असे आढ्ळून आल्यास अशांंवर कारवाई केली जाईल, काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील विविध भागात अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे, शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये म्हणून विक्रेत्यांवर वचक राहण्यासाठी कारवाई केली जाते.

विवेक सोनवणे, कृषी अधिक्षक, नाशिक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com