अग्रसेवा पॅनलची बाजी; ३७ वर्षांत पहिल्यांदाच झाली निवडणूक

अग्रसेवा पॅनलची बाजी; ३७ वर्षांत पहिल्यांदाच झाली निवडणूक

प्रतिनिधी । नाशिक Nashik

शहरातील अग्रवाल समाजाच्या अग्रवाल सभा नाशिक (Agrawal Sabha Nashik) या संस्थेच्या त्रैवार्षिक कार्यकारिणीसाठी रविवारी (दि.५) निवडणूक पार पडली. निवडणुकीतनंतर लगेलच झालेल्या मतमाेजणीत अग्र सेवा या पॅनलने (agraseva panel win the elections) बाजी मारली. विशेष म्हणजे तब्बल ३७ वर्षांनंतर कार्यकारिणी निवडीसाठी संस्था पहिल्यांदाच निवडणुकीला सामाेरे गेले हेाते...

अग्रवाल सभा नाशिकच्या कार्यकारिणीसाठी अग्र सेवा परिवार (Agraseva Pariwar) व अग्र नवचेतना (Agra Navchetana) या दोन गटांमध्ये निवडणूक रंगली हाेती. विश्वस्त पदाच्या सात जागेची निवड बिनविराेध करण्यात आली हाेतीे.

मात्र, कार्यकारी मंडळाच्या ९ व कार्यकारिणी सदस्यांच्या १२ जागा जागे साठी एकूण २१ जागांसाठी ४१ अर्ज दाखल झाले होते.

याचमुळे रविवारी (दि. ५) काठेगल्ली परिसरातील अग्रसेन भवन येथे सकाळी ९ वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला.

सांयकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. एकूण ५४३ सभासदापैकी ४१२ अग्रवाल सभासद बांधवांनी मतदानाचा हक्क बजावला.

अंत्यत खेळीमेळीच्या वातावरण संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान पार पडल्यानंतर त्याच ठिकाणी मतमाेजणीला सुरुवात झाली. यात अग्र सेवा पॅनलचे 17 तरअग्र नवचेतना 4 उमेदवार विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश अग्रवाल यांनी काम पाहिले.

हे आहेत विजयी उमेदवार

दीपक अग्रवाल (अध्यक्ष), रवींद्र केडिया ( महामंत्री), महावीरप्रसाद मित्तल (कार्याध्यक्ष) ,अरुणा अग्रवाल ( उपाध्यक्ष ) संदीप गोयल (उपाध्यक्ष) महेंद्र पोद्दार (उपाध्यक्ष), बालमुकुंद पोद्दार (मंत्री), सुनील अग्रवाल ( कोषाध्यक्ष), महेश अग्रवाल ( कायदेशीर सल्लागार)

कार्यकारिणी सदस्य

अमित अग्रवाल,एकता अग्रवाल,जितेंद्र अग्रवाल,मोहन अग्रवाल, नरेश अग्रवाल, रवींद्र अग्रवाल, सतीश अग्रवाल, शशी अग्रवाल, अजय गुप्ता, मनिष गुप्ता, प्रेमा हिसारिया, जयेश टीबरेवाला

विश्वस्त ( बिनविरोध निवड)

सुरेश गुप्ता, शेडू रामजी रुंगठा भगवानदास अग्रवाल, चंदुलाल अग्रवाल, श्यामजी ढेडिया, आर टी अग्रवाल, ओपी रुंग्ठा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com