...म्हणून खड्ड्यात उतरले मेनरोडचे व्यावसायिक

...म्हणून खड्ड्यात उतरले मेनरोडचे व्यावसायिक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमध्ये स्मार्ट सिटी (Nashik Smart City) अंतर्गत अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. संथ गतीने सुरु असलेल्या कामांमुळे येथील व्यावसायिक नाराज झाले आहेत. मेनरोड (Main Road) ते दहीपूल (Dahipul) या मार्गावर दोन्ही बाजूने रस्ते खोदण्यात आल्यामुळे संतप्त व्यावसायिकांचा संताप अनावर झाला असून थेट खड्ड्यात उतरूनच या व्यावसायिकांनी निषेध व्यक्त केला... (Agitation against smart city construction in nashik)

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या स्मार्ट कामांमुळे संपूर्ण शहर विद्रूप झाले आहे. जिथे बघावे तिथे अस्ताव्यस्त पार्किंग आणि रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य बघावयास मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले काम तातडीने मार्गी लागावे या मागणीसाठी मेनरोडवरील सर्व व्यापार्‍यांनी भर पावसात खड्ड्यात उतरत स्मार्ट कामाचा निषेध नोंदवला. काम पुर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. (Warning to smart city officials by shop owners)

आज सकाळी महात्मा गांधी रोडवरील दुकानदारांनी एकत्र येत स्मार्ट कामाचा निषेध नोंदवला. या कामामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे खड्डे खोदल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतींना याचा धोका पोहोचतो आहे. (

परिणामी, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तवली असुन याला स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांना दोषी ठरवण्यात येईल असा इशाराही दिला आहे. गेली अनेक महिने अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या कामाबाबत व्यापार्‍यांनी नाराजीही व्यक्त केली.

या कामामुळे या परिसरात वाहतुक कोंडी निर्माण होत आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाले असतांना आता कुठे जनजीवन पुर्वपदावर येत असतांना या कामामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे.

दोन्ही बाजूने रस्ते खोदण्यात आल्याने दुकानांमध्ये जाण्यासाठी या खडडयांवर पत्रे किंवा लाकडी फळया टाकून पूल बनविण्यात आला आहे. यामुळे एखाद्याचा तोल जाऊन अपघात होण्याचाही धोका आहे.

आंदोलनानंतर दखल घेत स्मार्ट सिटीचे अधिकारी शिंदे यांनी घटनास्थळांची पाहणी करत लवकरात लवकर काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी अतुल पवार, विजय सोमवंशी, नाना सोमवंशी, सागर मगर, निलेश कोठारी, सचिन कोपरगांवकर, उदय चौरसिया, गणेश मोगरे आदींसह व्यापारी सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com