नाशिक । प्रतिनिधी

नाशिक- पेट्रोल डिझेल ची दरवाढ सातत्याने होत आहे. पेट्रोल शंभर रुपयांपर्यत पोहोचले आहे. पेट्रोल वरती अबकारी कर कमी केला. मात्र पेट्रोलवर चार रुपये तर डिझेलवर अडिच रुपये कृषी अधिकार कर लावला आहे. राज्य व केंद्र सरकार मधिल सत्ताधारी पेट्रोल व डिझेल वरती कर कमी करून दिलासा जनतेला देण्याऐवजी खोटी आंदोलने करून दिशाभूल करीत आहे. त्या निषेधार्थ डावी लोकशाही आघाडीच्या वतीने अण्णाभाऊ साठे पुतळा जवळ निदर्शने करण्यात आली...

वीजबिल अनेक वर्षांपासून कधीही माफ झालेले नाही. मात्र इज भाजप सारखे पक्ष खोटे आंदोलन करीत आहेत. विजबील नियामक मंडळाकडून दरवाढ करून सर्व सामान्य जनतेला लुटण्याचे काम होत आहे.

केंद्र सरकार वीज बिल कायदा नवीन आणून सर्व सामान्य जनतेला गरीब, शेतकरी, घरगुती वीज वापर करणार्यांना१००युनिट पर्यंत ची सवलत रद्द करण्याची तरतुदी करीत आहेत. विज व्यवसाय लवकर खाजगीकरण करून आदाणी-अंबानी च्या ताब्यात देण्याचा डाव केंद्र सरकार चा आहे.

महाराष्ट्रातील उदयोग धंदे अडचणीत आणण्याचे षड्यंत्र भाजप करीत आहे. सताधा-यांनी खोटे आंदोलन महागाई विरोधात करणे बंद करून पेट्रोल डीजेल दरवाढ कमी करावी. विजबिल दर कमी करावे अशी मागणी डावी लोकशाही आद्याडीच्या वतीने करण्यात आली.

आज उपरोधिक आंदोलन करण्याची वेळ जनतेवर सत्ताधारी पक्षांनी आणली आहे. म्हणून पेट्रोल डिझेल दरवाढ शंभर रुपये करा, घरगुती गॅस सिलेंडर एक हजार रुपये करा, दारूची किंमत कमी करा अशी मागणी करण्याची वेळ सरकार ने सत्ताधारीनी आणली आहे.

आंदोलनत डावी लोकशाही आघाडीचे डॉ.डी. एल कराड, राजू देसले, गणेश भाई उनवणे, अॅड.मनीष बस्ते, तानाजी जायभावे, महादेव खुडे, शशी उनवणे, सीताराम ठोंबरे, आदी उपस्थित होते.