दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार नाशिक कोर्टात हजर झाले होते तेव्हाची आठवण...

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार नाशिक कोर्टात हजर झाले होते तेव्हाची आठवण...

नाशिक | प्रतिनिधी

आज महानायक ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. येथील देवळाली कॅम्प परिसरात त्यांचा बंगलादेखील आहे. त्यांच्या आई-वडिलांच्या नाशकातच कबरदेखील आहेत. नाशिकमध्ये बालपण गेल्यामुळे त्यांचे नाशिकशी घनिष्ट संबंध होते. दिलीप कुमार एकदा नाशिकच्या जिल्हा न्यायलयात हजर झाले होते. यावेळची आठवण सांगितली आहे. नाशिकमधील वकील अॅड धर्मेंद्र चव्हाण यांनी....

नाशिकच्या मीराताई बोराटे यांची त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगाव येथे शेतजमीन होती. त्याबाबत बोराटे व कुटुंबीय यांची कोर्टात केस प्रलंबित असताना व कनिष्ठ न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला असताना दिलीप कुमार व त्यांच्या भावांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या सहकार्याने सदरची जमीन कोर्टाचा स्थगिती आदेश असतानाही त्यांच्या नावावर करून घेतली होती.

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार नाशिक कोर्टात हजर झाले होते तेव्हाची आठवण...
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

हे प्रकरण दिवाणी होते पण मीराताई व त्यांच्या कुटुंबियांची फसवणूक करून तलाठी आणि सर्कल यांना हाताशी धरून दिलीप कुमार आणि त्यांचे भाऊ यांनी ही जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली होती.

या प्रकरणात मीराताई बोराटे यांच्या बाजूने मी (अॅड धर्मेंद्र चव्हाण) नाशिक न्यायालयात भा द वि कलम 420 468 471,34 आदि कलमा प्रमाणे फौजदारी खटला दाखल केला.

या खटल्यात दिलीप कुमार यांना जुहू येथील त्यांच्या घरी जाऊन समन्स बजावण्यात आला होता. तरीही ते नाशिक न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यानंतर न्यायालयाने अभिनेते दिलीप कुमार याना वॉरंट काढले होते.

शेवटी न्यायालयाने वारंट काढल्यानंतर दिलीप कुमार नाशिकला न्यायालयात हजर झाले होते. त्यांच्या जामीन अर्जास मी विरोध केला होता, दिलीप कुमार नाशिकला न्यायालयात आले तेव्हा त्यांच्या चाहत्यांची गर्दी जमली होती.

दिलीप कुमार यांची फौजदारी खटल्यात न्यायालयात हजर राहण्याची ही पहिलीच वेळ होती. न्यायालयाने त्यांना जामीन देऊन मुक्तता केली होती.

न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. यावेळी न्यायालयाच्या आवारात प्रचंड गर्दी जमली होती पोलीस बंदोबस्तही होता. यावेळी दिलीप कुमार आणि त्यांच्या वकिलांशी या खटल्यात बद्दल तडजोड करण्याबाबत आमची चर्चा झाली होती.

त्यानंतर दिलीप कुमार यांना या खटल्यात पुढे न्याय मिळणे जवळजवळ अशक्य असल्याने त्यांनी आमची तडजोड मान्य केली होती. सदर जमीन प्रकरणांमध्ये समझोता झाल्याने सर्व खटले मागे घेण्यात आले होते. दिलीपकुमार यांनी अखेर मीराबाई यांना रक्कम दिली होती हे प्रकरण पुढे उच्च न्यायालयात गेले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com