देवळा | तालुका प्रतिनिधी

मुद्रांक छेडछाड प्रकरणी देवळा दुय्यम निबंधक कार्यालयात तपास कामात अडथळा येऊ नये म्हणून आज दि. १० रोजी नवीन अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून आता नेमके तपासात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे...

देवळा येथील एकाच क्रमांकाचे दोन मुद्रांक व त्यात छेडछाड रॅकेट तालुक्यात सक्रिय असल्याची बातमी प्रसिद्ध होताच जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी तात्काळ तीन सदस्यीस पथकाची नेमणूक करून दि. ९ रोजी रात्री उशिरापर्यंत देवळा दुय्यम निबंधक कार्यालयात चोकशी केली.

त्यांच्या तपासात नेमके काय उघड होते याकडे सर्वांचे लक्ष लागून असतांना, आज दि. १० रोजी देवळा येथील दुय्यम निबंधक प्रकाश गांगुर्डे यांचे चोकशी होईपर्यंत पदभार काढून घेण्यात आले आहेत.

व त्यांच्या जागेवर माधव यशवंत महाले यांची तपास कामात अडथळा येऊ नये म्हणून नेमणूक करण्यात आल्याची माहिती आज जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी दिली. आता चोकशी दरम्यान नेमके काय समोर याकडे तालुका भरातील जनतेचे लक्ष लागून आहे.