सरत्या वर्षात 'इतके' अपघाती मृत्यू; विनाहेल्मेट अधिक दगावले

सरत्या वर्षात 'इतके' अपघाती मृत्यू; विनाहेल्मेट अधिक दगावले

नाशिक | वैभव कातकाडे Nashik

गेेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर 2021 या काळात अपघातात लक्षणीय वाढ झाली आहे. बारा महिन्यात महामार्ग, राज्य मार्ग आणि शहरांतर्गत रस्त्यांवर 155 अपघातात 163 मृत्यू झाले आहेत. यामध्ये 206 गंभीर अपघातांची नोंद झाली असून यामध्ये 244 पुरुष आणि 62 महिला असे 306 नागरिक गंभीर जखमी झाले. किरकोळ 43 अपघातात 429 जण जखमी झाले. (Accidents increased in last year in nashik)

शहरात पोलीस आयुक्तांतर्फे (city police dept) अपघात रोखण्यासाठी विविध पद्धतीने उपाययोजना करण्यात येत असल्यातरी अपघात वाढत आहे. नो हेल्मेट नो पेट्रोल (no helmet no petrol), हेल्मेट समुपदेशन (counselling for helmet), हेल्मेट न वापरणार्‍यांना शिक्षा म्हणून 2 तासाची परीक्षा, हेल्मेट नसल्यास कुठेही प्रवेश नाही या प्रकारच्या युक्त्या वापरून नागरिकांना हेल्मेट वापरण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून होत आहे.

शहरात वाढते अपघात रोखण्यासाठी रस्ते सुरक्षा समिती, आरटीओ आणि पोलीस प्रशासनाकडून ठोस नियोजन सुरू असतांना शहरात रस्ते अपघातांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. शहरातून जाणारे मुंबई-आग्रा रोड, औरंगाबाद महामार्ग, नाशिक-पुणे महामार्गावर आणि उड्डाणपुलावर अपघातात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे.

जानेवारी ते डिसेंबर या 12 महिन्याच्या कालावधीत अपघातांची संख्या बघता सर्वाधिक 22 अपघात मार्चमध्ये झाले. या अपघातात 22 जणांचा बळी गेला आहे. सर्वाधिक कमी अपघात एप्रिलमध्ये झाले. यात 8 अपघातात 8 जणांचा बळी गेला. रस्ते अपघातात 136 पुरुष आणि 13 महिलांचा बळी गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच गंभीर अपघातांची संख्या वाढली असून या अपघातात गंभीर जखमींची संख्या लक्षणीय आहे.

राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर एकूण 55 अपघात झाले असून एकूण 59 नागरिकांचे प्राण गेले आहेत यामध्ये 51 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. राज्य महामार्गावर 9 अपघातात 7 पुरुष आणि 2 महिला असे एकूण 9 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर शहर अंतर्गत रस्त्यांमधील 91 अपघातांतील 95 मृतांमध्ये 88 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे.

विनाहेल्मेट दुचाकीस्वार अधिक

रस्ते अपघातात विना हेल्मेट दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक आहे. शहरातील अपघातात 40 नागरिकांना हेल्मेट परिधान केलेले नसल्याने आपले प्राण गमवावे लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com