नाशकातून ६३ विनामास्क धारकांकडून ६३ हजारांचा दंड वसूल

नाशकातून ६३ विनामास्क धारकांकडून ६३ हजारांचा दंड वसूल

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये मास्क नियमितपणे न घालणारे नागरिक रडारवर असून आज झालेल्या कारवाईत ६३ नागरिकांकडून तब्बल ६३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई सिडको आणि नाशिकरोड परिसरात करण्यात आल्या आहेत...

करोनाचा नाशिक शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यापार्श्वभूमीवर नाशिकमध्ये करोना प्रतिबंधक नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे.

आज झालेल्या कारवाईमध्ये नाशिकरोड परिसरात एकूण १४ केस दाखल झाल्या आहेत. तर नाशिक पश्चिम भागात ९ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. नाशिक पूर्वमध्ये ११ नागरीका विना मास्क धारक आढळले.

आजच्या कारवाईतील सर्वाधिक मोठी कारवाई ही सिडको परिसरात झाली असून यामध्ये १५ नागरिकांकडून १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पंचवटीत एका नागरिकावर कारवाई झाली आहे तर सातपूरमध्ये १३ नागरिकांकडून १३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com