नाशिक जिल्ह्यात आज झाले विक्रमी लसीकरण; पाहा आकडेवारी

नाशिक जिल्ह्यात आज झाले विक्रमी लसीकरण; पाहा आकडेवारी

नाशिक। प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात पहिला आणि दुसरा डोस असे दोन्ही मिळून जवळपास २९ हजार जणांना कोरोना प्रतिबंधक लस (Covid Vaccination) टोचण्यात आली. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकुण १४ लाख २९ हजार ५२१ नागरीकांना लस देण्यात आली असून आजचे लसीकरण विक्रमी झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.... (Nashik District & City)

जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याचा (Shortage of covid vaccine) सामना करत लसीकरण मंदावलेले आहे. शहर तसेच जिल्ह्यात लसींची मागणी वाढली आहे. पंरतु त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने लसींचा तुटवडा जाणवत होता.

आतापर्यंत आठडाभरात सरासरी 13 ते 15 हजार लसी जिल्ह्यासाठी उपलब्ध होत होत्या. तर दररोज सरासरी पाच ते दहा हजार जणांचेच लसीकरण (Vaccination) होत होते. पंरतु काल (दि १५) जिल्ह्याला ४३ हजार लसी उपलब्ध झाल्याने या आठवड्यात लसीकरणाचा वेग वाढल्याचे चित्र पाहावयास मिळाले असून विक्रमी लसीकरण आज पार पडले.

16 जानेवारी 2021 पासून संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र गेली दिड महिनाभरापासून लसींचा तुटवडा असल्याने 300 पैकी निम्मे लसीकरण केंद्र बंद होते.

आज दिवसभरात नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) ३४ तर जिल्हाभरातील १०७ व मालेगाव (Malegaon) ६ अशा एकुण १४७ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. यामुळे आज दिवसभरात जिल्ह्यात १४ हजार ३२० जणांना पहिला डोस देण्यात आला.

यामध्ये नाशिक पालिका हद्दीत ५ हजार १४५, ग्रामिण जिल्ह्यात ८ हजार २२२, मालेगाव ९५३ असे लसीकरण झाले आहे. तर १४ हजार ६०० जणांना दुसरा डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत ३ हजार ५८३, ग्रामिण जिल्ह्यात १० हजार ३२६, मालेगाव ६९१ असे लसीकरण झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com