नाशकात एमडी ड्रग्जचा काळाबाजार

नाशकात एमडी ड्रग्जचा काळाबाजार

नाशिक | प्रतिनिधी

एमडी ड्रग्ज नावाचा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगणार्‍या दोघांना पोलीसांनी अमरधाम रोड येथून सोमवारी (दि.२४) जेरबंद केले. त्यांच्याकडून ४० हजार रूपये किंमतीचे २० ग्रॅम अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाने केली....

अश्पाक सलीम खान (३८) व शाहरूख युसुफ शेख (२४, रा. दोघेहीरा. पंचशीलनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेजन मारूती कारमधून अंमलीपदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अमरधाम रोडवरील शितळादेवी मंदिरासमोर संशयितांना ताब्यात घेतले.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे प्रत्येक १० गॅ्रम असे ४० हजार रूपये किंमतीचे एमडी नावाचे ड्रग्ज आढळून आले.

त्यांच्याकडून ड्रग्ज तसेच ५ लाखाची चारचाकी असा ५ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com