Photo Gallery : २४ तासांत नाशकात 'इतका' पाऊस; पाहा गंगेवरची सद्यस्थिती

Photo Gallery :  २४ तासांत नाशकात 'इतका' पाऊस; पाहा गंगेवरची सद्यस्थिती

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात गेल्या २४ तासांत १९ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या अनेक दिवसांपासून दडी दिलेल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. आज सकाळी पावसाची रिपरिप सुरूच होती. दुपारनंतर मात्र पावसान हुलकावणी दिली...

वातावरणात गारवा कायम असून बहुप्रतीक्षेत असलेल्या पावसाचे आगमन झाल्यामुळे पुन्हा एकदा नाशिकचा पाऊस अनुभवण्यासाठी आज सकाळी गोदातीरी अनेक नाशिककरांनी गर्दी केली होती.

दीड महिने लोटले तरीदेखील पावसाचे आगमन नाशकात झालेले नव्हते. कालपासून सुरु झालेल्या पावसाने रात्री चांगलाच जोर धरला होता. गोदावरी नदीत शहरातील पाणी वाहून आल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती.

आज सकाळी पाऊस ओसरल्यानंतरची परिस्थिती कॅमेऱ्यात कैद केली आहे आमचे प्रतिनिधी सतिश देवगिरे यांनी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com