Video : दहावीची परीक्षा? विद्यार्थ्यांना काय हवे, जाणून घ्या

Video : दहावीची परीक्षा? विद्यार्थ्यांना काय हवे, जाणून घ्या

नाशिक | प्रतिनिधी

कोरोना काळात दहावीची परीक्षा होणार की नाही? यावर गेल्या काही दिवसांपासून राज्यात खल सुरु आहे. शासनाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुण्यातील प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी दहावीच्या परीक्षा न घेण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

उच्च न्यायालयाने शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सरकारला फटकारले. न्यायालयाने सांगितले की, ‘तुम्ही शिक्षणाचा खेळखंडोबा करताय का? करोनाच्या नावाखाली आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान करू शकत नाही.

दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असेल तर ती कधी घेणार आहात? दहावीची रद्द करून तुम्ही बारावीची घेणार असल्याचे म्हणताय? हा काय गोंधळ आहे?', अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने दहावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. पण सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम आहे.

एकंदरीत कोरोनाकाळात दहावीच्या विद्यार्थ्यांचा खेळखंडोबा होत आहे. शासनाकडे अजून स्पष्ट धोरण नाही. परीक्षा न घेतल्यास विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण कसे देणार? अकरावीचे प्रवेश कसे होणार? या सर्व बाबी अजून स्पष्ट नाही. यावर विद्यार्थ्यांना काय वाटते जाणून घ्या या व्हिडिओमधून...

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com