नाशकात १ हजार ५१७ रुग्णांवर होतायेत उपचार

आतापर्यंत २ हजार ११९ करोना रुग्णांना डिस्चार्ज
नाशकात १ हजार ५१७ रुग्णांवर होतायेत उपचार

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील २ हजार ११९ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १ हजार ५१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत २२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नाशिक जिल्हा रूग्णालय ७६ , नाशिक महानगरपालिका ९८२, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय १२०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४, नाशिक ग्रामीण डी.सी.एच.सी. व सी.सी.सी. १८१, गृह विलगीकरण ७४ असे एकूण १ हजार ५१७ कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत ३ हजार ८६१ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

आज जिल्ह्यात नव्याने नाशिक जिल्हा रूग्णालय ०९, नाशिक महानगरपालिका ३५७, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय ०३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्र ३०, तर नाशिक ग्रामीण डी.सी.एच.सी. , सी.सी.सी. ११२ व गृह विलगीकरण ४३ असे एकूण ५५४ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.

आजपर्यंत नाशिक ग्रामीण ४२ ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ९९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७३ व जिल्हा बाहेरील ११ अशा एकूण २२५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

३ हजार ८६१ करोनाबाधित रुग्णांपैकी २ हजार ११९ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार ५१७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com