नवीन वाहनांच्या आॅनलाइन नोंदणीला 'हिरवा कंदील'

नवीन वाहनांच्या आॅनलाइन नोंदणीला 'हिरवा कंदील'

नाशिक | प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने नवीन खरेदी होणाऱ्या वाहन नोंदणीला 1 मे पर्यंत ब्रेक लावण्यात आला होता. मात्र, शासन आदेशापूर्वी तसेच गुढीपाडवा सणानिमित्त विक्री झालेल्या वाहनांचे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे अशा वाहनांची नोंदणी करण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांनी दिल्या आहे. यामध्ये मोटार वाहन निरिक्षक वाहनांची पाहणी करणार नसून ऑनलाईन पद्धतीनेच या वाहनांची नोंदणी केली जाणार आहे.

राज्य शासनाने कडक निर्बंध लावल्याने प्रादेशिक परिवहन विभागानेही स्वतंत्र आदेश काढून फक्त ऑनलाईन कामकाज केल्या जाणार अशा सुचना काढल्या होत्या, त्याशिवाय नविन वाहनांची नोंदणी सुद्धा थांबविण्यात आली होती.

मात्र, परिवहन आयुक्तांच्या आदेशापुर्वीच खरेदी झालेली आणि गुढीपाडव्याचे औचित्त साधून खरेदी झालेल्या वाहनांची नोंदणी प्रलंबीत असल्याने अशा वाहनांची नोंदणी करण्याची मागणी राज्यातील वाहन वितरकांनी केली होती. त्यानुसार आता १३ एप्रिलपुर्वी खरेदी झालेल्या वाहनांची नोंद करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, परिवहन आयुक्तांनी तशी परवानगी दिली आहे.

यामध्ये नविन वाहनांच्या चॅसिस व इंजिन क्रमांकाच्या आधारे वाहन विक्रेत्याने ऑनलाईन अर्ज, विमा पुरावा व पत्त्याचा पुरावा वितरकांनी प्रमाणीत केलेला अर्ज वाहन नोंदणीसाठी स्विकारल्या जाणार आहे.

संपूर्ण अर्ज वाहन वितरकांना अर्जाची स्कॅन कॉपी कार्यालयाच्या ई-मेलवर पाठवायची आहे. तर वाहनांचे नोंदणी शुल्क व कर, वाहन ४. ० प्रणालीवर भरुन घेऊन, मोटार वाहन निरिक्षक व नोंदणी अधिकाऱ्यांने संगणकावर मान्यता दिल्या जाणार आहे.

अशा आहे सूचना

* वाहन वितरकांनी कागदपत्रे तपासल्याच्या प्रमाणपत्रासोबत वाहनाच्या चॅसिस क्रमांकाची पेन्सिल प्रिंट व छायाचित्र कार्यालयाच्या ई-मेल पत्त्यावर पाठवावे.

* वाहन वितरकांनी वरील प्रमाणे अर्ज सादर करतेवेळी एक हमीपत्र सादर करावे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com