जिल्हा बँकेतून कर्जपुरवठा करताना शेतकर्‍यांची अडवणूक

जिल्हा बँकेतून कर्जपुरवठा करताना शेतकर्‍यांची अडवणूक
NDCC Nashik

मुखेड| वार्ताहर

जिल्हा बँकेतुन कर्जपुरवठा करताना शेतकर्‍यांची अडवणूक केली जात असल्यामुळे, शेतकर्‍यांची आर्थिक कुचंबना होत असून, जिल्हा बॅकेच्या अडवणूकीच्या धोरणामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे...

येथील प्रगतीशील शेतकरी अशोक महाले व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई महाले यांच्या नावे सात एकर जमिन आहे. त्यांच्या सातबार्‍यावर कोनतेही कर्जनसुन सातबारा नील आहे . ह्यावेळी खरीप हंगाम उभा करण्यासाठी त्याना कर्जाची गरज होती.

त्यामुळे त्यानी विविध कार्यकारी सस्थेच्या माध्यमातुन कर्जाची मागणी केली. मात्र जिल्हा बॅकेच्या इन्सपेक्टर महोदयानी महाले याना कर्जपुरवठा करण्यास नकार दिला. यासाठी त्यानी दिलेले कारण ही अफलातुन होते.

मागील वर्षी महाले यांनी कर्ज न घेतल्यामुळे यावेळी कर्ज देता येणार नाही. असे कारण देऊन त्यानी महाले यांना कर्जपुरवठा करण्यास नकार दिला. गेल्या दोन वर्षापासुन करोना महामारीमुळे शेतकरी आणी शेती व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे.

अशा परीस्थीत शेतकर्‍यांना इतके कोटी नी तितके अब्ज रुपयांचा कर्जपुरवठा करणार असल्याच्या वल्गना शासन करत असतांना प्रत्यक्ष ग्राउंड वरील परिस्थीती मात्र भीषण आहे. पदोपदी शेतकर्‍यांची अडवणुक करण्यासाठी जागोजागी झारीतील शुक्राचार्य ठिकठिकाणी बसले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com