उद्यापासूून धावणार ‘नाशिक-नागपूर’ लालपरी

या मार्गावरही १४ पासून बससेवा
बस सेवा
बस सेवा

नाशिक | Nashik

कराेना संकटाचा सामना करत असतांना ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

त्यानुसार नाशिककरांसाठी आनंदाची बातमी असून उद्या (दि. १४)पासून नाशिक-नागपूर साधी शयनयान बससेवा अखेर सुरू केली जाणार आहे.

तसेच नाशिकहून साेलापूर, अकाेला व परळी वैजनाथ येथेही बस वेळेवर साेडल्या जाणार अाहेत.

कराेना संसर्ग व त्यामुळे केलेल्या लाॅकडाऊनमुळे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १८ हजार बसगाड्या आगारातच ठेवल्या गेल्या.

केवळ आपात्कालीन बससेवा काही जिल्ह्यात सुरू हाेती. आधीच महामंडळ आर्थिक संकटात असून एक लाख कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठीही पैसे त्यामच्याकडे शिल्लक नाही. दरम्यान, गेल्या तीन आठवड्यापूर्वी राज्यात आंतरजिल्हा बस वाहतूक सुरू करण्यात अाली. त्यानुसार आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत आंतर जिल्हा व लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

दिनांक १४ पासून नाशिक येथून नागपूरसाठी साधी शयनयान बस सेवा सुरू हाेईल. तसेच नागपूर करता नाशिक येथून रात्री आठ वाजता, मालेगाव येथून रात्री सव्वा दहा वाजता, धुळे येथून रात्री वाजता, जळगाव येथून दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी व भुसावळ येथून दुपारी पावणेतीन वाजता गाड्या साेडल्या जातील. तसेच नागपूर येथून नाशिकसाठी परतण्याकरता बस रात्री आठ वाजता सुटेल.

या मार्गांवरही दि. १४ पासून बससेवा

नाशिक- सोलापूर मार्गावर सकाळी साडेनऊ व रात्री आठ वाजता. नाशिक- अकोला सकाळी ८.३० वाजता. नाशिक-लोणार सकाळी ७.३० वाजता. नांदगाव- परळी वैजनाथ

९.१५ वाजता. नांदगाव देऊळगाव राजा ११.०० वाजता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com