
नाशिक । प्रतिनिधी Nashik
पश्चिम विभागात ( Nashik Western Division) काही इच्छुक उमेदवारांंची गैरसोय झाली असली तरी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या इच्छुंकांंची सोय झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे थोडी खुशी जादा गम अशी परिस्थिती आहेे.
येथील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अजय बोरस्ते, अजिंक्य फरांंदे, डॉ.हेमलता पाटील, आशा चव्हाण, निखील पवार, भोसले यांच्यात चुरस पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. स्वाती भामरे, हिमगौरी आडके,मुन्ना हिेरे यांंच्या प्रभागाचा बहुतांशी भाग हा 9 प्रभागात आल्याने त्यातील काही जणांच्या उड्या येथे पडून ते नशीब अजमावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रभाग दहा मध्ये प्रा. वर्षा भालेराव, हिमगौरी आडके, विलास शिंदे, मुन्ना हिरे हे विद्यमान तर पवन भगुरकर, देवदत्त जोशी यांंना सोयीचा प्रभाग झाल्याने त्यांंनी तयारी सुरु केली आहे. प्रभाग अकरा संंगीता देसाई, किशोर शिरसाठ, संतोष गायकवाड यांचा सोयीचा प्रभाग झाला आहे. तर प्रभाग सोळा मध्ये भाजपातीलच सुरेश पाटील, शिवाजी गांंंगुर्डे हे इच्छुक आहेत. आता तेथे दोन पुरुषांना जागा झाल्याने दोघांंची सोय झाली आहे.
यापूर्वी एकाला तडजोड अथवा बंडखोरी करावी लागत होती.आता मात्र दोघे उभे राहु शकतील. एक से भले दोचा अनुभव घेता येईल.त्यातचा लक्ष्मण सावजी यांची कन्या पुर्वा सावजी येथे तयारी करत आहेत. ते तिघे उभे राहिल्यास कमळला पोषक वातावरण निर्माण होईल. त्यामुळे राष्ट्रवादी काँंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व काँग्रेसचे समीर कांबंळे हे इच्छुक असले तरी त्यांंना एकतर सौभाग्यवतींना पुढे आणावे लागेल.अन्यथा किंग मेकरची भुमिका बजवावी लागेल.प्रभाग सतरामध्ये प्रशांत जाधव, प्रथमेश गिते यांच्यातच चुरस दिसण्याची शक्यता आहे.