दोन वर्षात 'इतक्या' अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा

दोन वर्षात 'इतक्या' अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा
File PhotoFile Photo

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापलिकेच्या (Nashik NMC) अतिक्रमण निर्मुलन मोहीमेला (Anti-Encroachment Drive) करोनाने (Corona) सुमारे पावणे दोन वर्ष चांगलाच ‘ब्रेक’ दिला. तरी सुमारे दोन वर्षाच्या काळात विविध अतिक्रमणाच्या बाबतीत मनपाला एकूण 192 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर एकूण 42 अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा पडला. नव्या वर्षात अधिक जोरदारपणे कारवाई होणार आहे...

करोनामुळे (Corona) सर्वत्र लॉकडाऊनची (Lockdown) परिस्थिती होती. याकाळात सर्वप्रकाचे कामकाज बंद होते. तर शासकीय पातळीवरदेखील अनेक निर्बंध होते. यामध्ये न्यायालयाचा आदेशदेखील असल्याने मनपाकडून अतिक्रमण निर्मुलनाची पाहीजे तशी कारवाई झाली नाही. मात्र किरकोळ व मध्यम स्वरुपाच्या कारवाई सुरूच होत्या.

नाशिक शहराचा (Nashik City) झपाट्याने विकास (Development) होत असून यामध्ये अतिक्रमणातदेखील प्रचंड वाढ झाली आहे. शहरातील काही भागात तर काही दुर्घटना घडली तर अग्नीशामक दलाची (Fire brigade) गाडी जाण्यासाठी देखील जागा मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे शहरातील अतिक्रमण काढण्याची मागणी सतत होत असते.

मनपाच्या महासभा (General Body Meeting), स्थायी समिती सभेतदेखील (Standing Committee meeting) दिवाळीच्या (Diwali) काळात अतिक्रमण (Encroachment) विषयावर जोरदार चर्चा होऊन विशेष मोहीम (Campaign) हाती घेण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतरपासून शहरात लहान मोठ्या स्वरुपात अतिक्रमणविरुध्द कारवाई सुरूच आहे.

दि. 1 जानेवारी 2020 ते दि. 31 डिसेंबर 2021 या काळात मनपा अतिक्रमण विभागाकडे विविध प्रकारे एकूण 192 तक्रारी प्राप्त झाले, यातील 42 तक्रारी निकाली काढण्यात येऊन कारवाई करण्यात आली. आले. 150 तक्रारी शिल्लक आहे. यामध्ये आरक्षित जागेवरील 6 व खासगी 144 चा समावेश आहे.

मनपाची कारवाई नियमितपणे सुरू असते. दररोज शहरातील सहा विभागात अतिक्रमण हटविण्यात येत आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे.

- करुणा डहाळे (मनपा उपायुक्त, अतिक्रमण)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com