नाशिक मनपातील निवीदा समिती बरखास्त

नगरसेवकांच्या आक्षेपानंतर आयुक्तांची कार्यवाही
नाशिक मनपातील निवीदा समिती बरखास्त

नाशिक । Nashik

महापालिकेच्या पेस्ट कंट्रोलच्या निवीदा प्रक्रियेत निवीदा समितीची संशयसापद भूमिका समोर आल्यानंतर स्थायी सदस्यांसह काही पदाधिकार्‍यांनी केलेल्या मागणीनुसार...

आयुक्त कैलास जाधव यांनी अतिरीक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेली निवीदा समिती बरखास्त केली आहे.

या निर्णयानंतर आता संबंधीत विषयांतील तज्ज्ञ व त्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी निवीदेसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

मागील महिन्यातील स्थायी समितीच्या बैठकीत पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यासंदर्भातील डॉकेटवर चर्चा झाल्यानंतर याबाबत राबविण्यात आलेल्या निवीदा प्रक्रियेतील अनेक गंभीर त्रुटी सदस्यांनी समोर आणल्या होत्या.

यानिवीदेतील आकडे कसे फुगले ? तांत्रिक समितीत कोण काम करतात, टेंडर उघड्यासंदर्भात अहवाल अभिप्राय निवीदा समितीचा असतांना कोणाच्या दबावाखाली काढली गेली नाही, असा प्रश्न उपस्थित करीत एकुणच समितीच्या कारभारांवर गंभीर आरोप झाले होते.

ग्रॅज्युएटी लागु होते आणि नाही असे दोन भिन्न मते समितीने व्यक्त केल्याचे समोर आले होते. एक ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून ही निवीदा काढण्यात आल्याचा आरोप झाला होता.

अशाप्रकारे निवीदा समितीवर संशय व्यक्त करण्यात आला होता. हाच धागा पकडुन सत्ताधारी भाजपाकडुन निवीदा समिती बरखास्त करण्याची मागणी थेट आयुक्तांकडे करण्यात आली होती.

या सत्ताधारी व विरोधकांच्या मागणीनुसार आयुक्त जाधव यांनी नुकतीच महापालिकेतील अतिरीक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली असलेली निवीदा समिती बरखास्त केली आहे. या आयुक्तांच्या निर्णयामुळे आता निवीदा प्रक्रियेतील ठराविक ठेकेदाराची रिंग तोडण्यास मोठी मदत होऊ निवीदेत चांगली स्पर्धा होऊन महापालिकेची अर्थिक बचत होणार आहे.

आता ही समिती रद्द करण्यात आल्यानंतर संबंधीत विषयातील तज्ज्ञ व संबंधीत विभागातील वरिष्ठ अधिकारी निवीदेसंदर्भात निर्णय घेणार आहे. यामुळे चांगल्या प्रकारे निवीदा प्रक्रिया होणार असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com