महापालिकेकडून 'ती' धोकादायक कमान जमीनदोस्त

महापालिकेकडून 'ती' धोकादायक कमान जमीनदोस्त

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

महापालिकेच्या जुन्या प्रभाग क्रमांक 22 मधील व सध्याच्या प्रभाग क्रमांक 43 मध्ये असलेल्या विहितगाव (Vihitgaon) येथील सौभाग्यनगर (Saubhagyanagar) जवळील लॅमरोडवर असलेले धोकादायक कमान (Dangerous Arch) पाडण्यास सुरुवात केली असून ही कमान पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात येणार आहे...

सौभाग्यनगर जवळील असलेली कमान ही दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली होती पावसाळ्यात (Rainy Days) ही कमान कधीही कोसळली असती. नागरिकांच्या तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना धोका निर्माण झाला असता. काही वर्षांपूर्वी या कमानीचा काही भाग पडून तीन जण ठार झाले होते.

ही घटना अद्यापही नागरिकांच्या लक्षात आहे. कमान पाडण्यात यावी म्हणून नगरसेविका सुनीता कोठुळे (Sunita Kothule), नगरसेवक केशव पोरजे (Keshav Porje), जगदीश पवार (Jagdish Pawar) तसेच योगेश गाडेकर (Yogesh Gadekar) यांनी महापालिकेला (NMC) व पोलीस स्टेशनला (Police Station) पत्र दिले होते.

अखेर या पत्राचे महापालिकेच्या संबंधित विभागाने दखल घेऊन आजपासून जेसीबीच्या (JCB) साह्याने कमान पाडण्यास सुरुवात केली. ही कमान पाडत असताना या भागातील अनेक रहिवाशी त्या ठिकाणी जमा झाले होते. कमान पाडणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com