नाशिक महापालिकेची आता ऑक्सिजन हेल्पलाईन

नाशिक महापालिकेची आता ऑक्सिजन हेल्पलाईन
महानगरपालिका

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरामध्ये मागील काही दिवसांपासून विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे. तसेच अनेक रुग्णालयामार्फत एक दोन तास आधी कळविण्यात येते की, ऑक्सिजन संपला आहे. तातडीने काहीतरी करा अथवा आमचे रुग्ण इतरत्र शिफ्ट करायची परवानगी द्या.
अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये रूग्ण रुग्णाचे नातेवाईक यांची हेळसांड होते...

म्हणून नाशिक महानगर पालिकेतर्फे ऑक्सीजन हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे.
या हेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक 0253-2220800 असा आहे.

खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजनची मागणी त्यांच्या संबंधित ऑक्सिजन पुरवठा दाराकडे किमान 24 तास किंवा त्यांच्या करारनामाप्रमाणे नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.


यानंतर 16 तासांमध्ये हा पुरवठा पुरवठादारांकडून न झाल्यास नाशिक महानगरपालिकेच्या ऑक्सीजन हेल्पलाइनला रुग्णालयांनी संपर्क साधावा. त्यानुसार हेल्पलाईन तर्फे ऑक्सिजन पुरवठा धारकास ऑक्सिजन पुरवठा करण्यास सांगितले जाईल तसेच याबाबत जिल्हा ऑक्सिजन हेल्पलाइन कक्षास माहिती दिली जाईल.

पुरवठादाराकडे ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्यास अप्पर जिल्हाधिकारी यांचे सनियंत्रातील मेडिकल ऑक्सीजन नियंत्रण कक्षास सांगितले जाईल. यामध्ये सर्व विभागीय अधिकारी यांना याबाबत सर्व खाजगी रुग्णालयांना माहिती देणे व या रुग्णालयांची खाटा संख्या अद्ययावत करण्याचे कामकाज विभागीय स्तरावर करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

तसेच सर्व खाजगी रुग्णालय व्यवस्थापकांनी त्यांच्या रुग्णालयाचे ऑक्सिजन ऑडिट करून घेण्याबाबत आदेश दिले आहेत.

रूग्णालयामधील ऑक्सीजनचे असलेले लिकेजेस तसेच ऑक्सिजन यंत्रणांमधील विविध सामग्री यांची देखभाल-दुरुस्ती याबाबत प्रमाणपत्र अहवाल सर्व रुग्णालय व्यवस्थापकांनी मनपाकडे सादर करण्याबाबत आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com