स्मार्ट सिटीच्या 33 कोटींची नाशिक मनपाला प्रतीक्षाच

स्मार्ट सिटीच्या 33 कोटींची नाशिक मनपाला प्रतीक्षाच
नाशिक मनपा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्र सरकारच्या (Central Government) स्मार्ट सिटी (Smart City) प्रकल्पामध्ये केंद्रासह राज्य शासन तसेच नाशिक महापालिकेचा (Nashik NMC) वाटा होता. नाशिक महापालिकेच्या अडीचशे कोटी पैकी 200 कोटी रुपये स्मार्ट सिटी कंपनीला यापूर्वीच देण्यात आलेले आहे....

मात्र कामाची गती पाहिल्यावर निधी (Fund) खर्च झालेला नसल्यामुळे यापैकी शंभर कोटी रुपये नाशिक महापालिकेला (Nashik NMC) परत मिळावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी यांनी केली होती.

तर रक्कम परत न मिळता त्यापोटी व्याजाची रक्कम महापालिकेला मिळणार, असे स्मार्ट सिटीने कबूल केले होते, मात्र अद्यापही व्याजापोटीचे सुमारे 33 कोटी रुपये महापालिकेला अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे नाशिक महापालिकेची विकास कामे (Development works) रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक महापालिकेचे पैसे स्मार्ट सिटीकडे पडून आहे. यामुळे शहरातील विकास कामांसाठी शंभर कोटी रुपये स्मार्ट सिटीने परत महापालिकेला द्यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करण्यात आली होती. तर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) हे महापौर असताना महासभेत याबाबतचा प्रस्तावदेखील पारित करण्यात आला होता.

नाशिक मनपा
कादवा कारखान्यावर विकास पॅनलची सत्ता; पाहा संपूर्ण निकाल 'इथे'

मात्र स्मार्ट सिटीने (Smart City) फक्त व्याजापोटीची रक्कम देण्याचे कबूल केले होते. मागील दोन महिन्यापूर्वी झालेल्या स्मार्ट सिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे सचिव लिमये यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये झालेल्या आढावा बैठकीत नाशिक महापालिकेला व्याजापोटी सुमारे 33 कोटी रुपये देण्याचे ठरले होते.

नाशिक मनपा
राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मुस्लीम पदाधिकाऱ्यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

ती रक्कम 31 मार्चपर्यंत महापालिकेला मिळणे अपेक्षित होते. मात्र 31 मार्च संपून पाच दिवस उलटले तरी नाशिक महापालिकेला स्मार्ट सिटी कंपनीकडून व्याजापोटीची सुमारे तीस कोटी रुपयांची रक्कम आता झालेले नाही. यामुळे नाशिक महापालिकेच्या विकासकामांना अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी स्मार्ट सिटी कंपनी हे पैसे कधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.