भंगार वाहनांमधून मनपाला तीन लाख; आणखी 'इतक्या' रुपयांची अपेक्षा

भंगार वाहनांमधून मनपाला तीन लाख; आणखी 'इतक्या' रुपयांची अपेक्षा
नाशिक मनपा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) भंगारात पडलेल्या सुमारे 27 विविध प्रकारच्या वाहनांचे लिलाव (Vehicle Auction) करण्यात आले होते, मात्र पाहिजे त्या प्रमाणात वाहनांना बोली न लागल्यामुळे 27 पैकी फक्त 4 वाहनांचे लिलाव करण्यात येऊन महापालिकेला 3 लाख रुपयांचे उत्पन्न (Income) मिळाले. आता उर्वरित गाड्यांसाठी फेरलिलावाची प्रक्रिया होणार असून महापालिकेला (Nashik NMC) एकूण सुमारे 25 लाख रुपये अपेक्षित आहे.....

नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) विद्युत व यांत्रिकी विभाग (कार्यशाळा शाखा) तर्फे लिलाव प्रक्रिया करण्यात आली होती. नुकतेच हे लिलाव वर्कशॉप, मालेगांव स्टेण्ड, पंचवटी नाशिक येथे झाले होते.

यामध्ये ट्रक (Truck), जीप (Jeep), जेसीबीसह (JCB) इतर वाहनांचा समावेश होता. एक जीपचे पावणे दोन लाख तर इतर 3 गाड्यांचे सव्वा लाख रुपये याप्रमाणे 3 लाख रुपये महापालिकेला मिळाले होते.

27 पैकी फक्त चार वाहने यांच्या लिलाव करण्यात आला होता झाला होता मात्र आता पुन्हा हे गाड्यांचा लिलाव करण्याची तयारी महापालिका प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. दरम्यान उर्वरित वाहनांमधून महापालिकेला सुमारे 25 लाख रुपये महसूल मिळणे अपेक्षित असून इतर शासकीय कर (TAX) तसेच जीएसटीची (GST) रक्कम देखील लिलाव घेणारच भरणार आहे.

Related Stories

No stories found.