नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महापालिकेत आग लागल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. अथक प्रयत्नाअंती ही आग आटोक्यात आल्याने सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला.

शिवसेना गटनेता कक्ष व विरोधी पक्षनेता कार्यालयाला ही आग लागली होती. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून कर्मचारी याठिकाणी काम करत असताना अचानक आगीचा भडका उडाल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले आहे...

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून दोन अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आगीला आटोक्यात आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.