नाशिक महापालिका आयुक्त नागरिकांशी साधणार संवाद
नाशिक

नाशिक महापालिका आयुक्त नागरिकांशी साधणार संवाद

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून थेट संवाद

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे हे शनिवारी (दि.१८ ) संध्याकाळी ५ वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. सध्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनामध्ये विविध प्रकारच्या प्रश्नांसंबंधी साशंकता आहे. या प्रश्नांना महापालिका आयुक्त उत्तरे देणार आहेत.

आयुक्तांकडून उत्तरे मिळाल्यामुळे जनमानसातील संभ्रम दूर होऊन नागरिकांना योग्य ती माहिती मिळण्यास मदत होईल. सदर कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी नागरिकांनी https://bit.ly/NashikFacebooklive या लिंकवर क्लिक करून आपले प्रश्न विचारावेत. नागरिक आपले प्रश्न तसेच सूचना दि. १७ जुलै, दुपारी २ वाजेपर्यंत पाठवू शकतात. नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com