नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत खासदार गोडसे म्हणतात

file photo
file photo

नाशिक । Nashik

नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वे लोहमार्गाचा (Pune - Nashik High Speed ​​Railway) प्रश्न गेल्या अनेक वर्षात पासून प्रलंबित आहे.यासाठी खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्या अथक प्रयत्नातून या प्रकल्पाला राज्य आणि केंद्राची मान्यता मिळालेली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

राज्य आणि केंद्राने या प्रस्तावित सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला मंजुरी दिलेली असली तरी केंद्राकडून (central government) अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. यामुळे नाशिककरांसाठी महत्त्वकांशी असलेला प्रकल्प रेंगाळलेला असल्याने तातडीने या रेल्वे मार्गाला अंतिम मान्यता द्यावी अशी मागणी खा हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांच्याकडे केली आहे...

नाशिक - पुणे - मुंबई हा राज्याच्या विकासाचा सुवर्ण त्रिकोण आहे. मुंबई आणि पुणे (Mumbai & Pune) या दोन मोठ्या शहरांना जोडणारा लोहमार्ग असल्यामुळे पुणे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु नाशिक - पुणे थेट लोहमार्ग नसल्याने त्या तुलनेने नाशिकचा (Nashik) विकास मंदावलेला आहे.यातूनच नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग व्हावा यासाठी गेल्या पाच वर्षांपासून खा गोडसे सतत प्रयत्नशील आहेत.

याकामी त्यांनी वेळोवेळी संसदेमध्ये (Parliament) आवाज उठविला असता लोहमार्गाचे सर्वेक्षण करून घेतले आहे. प्रस्तावित नाशिक - पुणे लोहमार्गास राज्य आणि केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे .या प्रकल्पासाठी सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पैकी राज्य आणि केंद्र प्रत्येकी २० टक्के तर इक्विलिटी मधून ६० टक्के निधी उपलब्ध होणार आहे.

नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या सर्व मान्यता आणि निधी उपलब्धतेचे प्रश्न मार्गी लागून आणि केद्रांच्या वित्त विभागाची मंजुरी मिळूनही वर्ष उलटले तरीही केंद्राकडून अद्याप पावतो अंतिम मंजुरी मिळालेली नाही.यामुळे तमाम नाशिककरांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा रेल्वेमार्ग नाशिक, नगर, पुणे (Nashik - Nagar - Pune) या तीन जिल्हयांमधून जाणार असल्याने या लोहमार्गामुळे या शहराचे दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. यातूनच पुणे शहरासारखाच नाशिकचाही झपाट्याने विकास होणार आहे.

तसेच नाशिक - पुणे लोहमार्ग हा नाशिककरांसाठी एक वरदानच ठरणार असून उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याचे खा गोडसे यांनी ना. अश्विनी वैष्णव यांना पटवून दिले. नाशिकच्या विकासाची चक्र वेगाने फिरण्यासाठी या रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करावे अशी गळही गोडसे यांनी अश्विनी वैष्णव यांना घातली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com