दिलीप कुमारांचे नाशिक कनेक्शन : देवळालीत शिक्षण, मिसळ,बटाटेवडा आणि झुणका भाकर होती 'फेव्हरेट'

नांदूरवैद्य येथे शुटींग झालेल्या गंगाजमुना चित्रपट झाला होता 'सुपरहिट'
दिलीप कुमारांचे नाशिक कनेक्शन : देवळालीत शिक्षण, मिसळ,बटाटेवडा आणि झुणका भाकर होती 'फेव्हरेट'

नाशिक | प्रतिनिधी

बॉलीवूडचे महानायक ज्येष्ठ अभिनेते मोहम्मद उसुफ खान उर्फ दिलीप कुमार यांचे आज वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्यावर मुंबईत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

नाशिकशी घनिष्ट संबंध दिलीप कुमार यांचे होते, अनेकदा ते नाशिकला येत असायचे. नाशिकचे खाद्यपदार्थ त्यांना फार आवडत होते. तसेच त्यांचा सुपरहीट ठरलेला चित्रपटाचे शुटींगदेखील नाशकातच झाले होते...

दिलीप कुमार यांचे देवळाली कॅम्पशी जिव्हाळ्याचे नाते होते. दिलीपकुमार यांचे बालपणीचे शिक्षण देवळाली कॅम्पला मुसा कॉटेज तसेच बार्न्स स्कूल येथे झाले. त्यांचे बालपण या भागातच गेले. त्यामुळे ते शुद्ध मराठी भाषा बोलायचे.

मराठी इतकी चांगली कशी बोलू शकता यावर जर कुणी त्यांना विचारले तर ते आनंदाने सांगायचे की माझं शिक्षण महाराष्ट्रात म्हणजेच नाशिकमध्ये झाले आहे. तेव्हापासून आपल्याला मराठीची आवड आहे.

देवळालीत त्यांचे पुतणे जावेद नूर महोमद खान राहतात. स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९४२ ला दिलीपकुमार यांच्या आई आयेशा खान यांना प्रकृती अस्थमाचा त्रास होता. त्यामुळे त्यांना देवळाली कॅम्पच्या फातिमा सॅनोटरीत आणण्यात आले होते.

वडील गुलाम खान हे तोफखाना केंद्राला लष्कराला फळपुरवठा करत होते. देवळाली कॅम्पला असताना दिलीपकुमार यांच्या मातोश्री आयेशा खान यांचे निधन झाले. याठिकाणी त्यांची कबर आहे. अनेक वर्षे ते आईच्या कबरीवर चादर चढवायला येत असत.

दिलीप कुमार यांचा गंगा जमुना चित्रपट नाशिकमध्ये चित्रित झाला होता. येथील नांदुर वैद्य, रोकडोबा गाव परिसरात चित्रीकरण झाले होते. १९५६ ते १९६० जवळपास तीन वर्ष गंगा जमुना चित्रपटाचे चित्रीकरण याठिकाणी झाले. १९६१ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिटही झाला होता. या चित्रपटातील एक वाडा वापरण्यात आला होता हा वाडा रोकडे कुटुंबियांचा होता. एकूणच बालपणापासून नाशिकशी दिलीप कुमार यांचे संबंध घनिष्ट होते.

शुटींगसाठी नाशिकची निवड

दिलीप कुमार नाशिकमध्ये असताना त्यांचा भाऊ नासिर आणि मित्र मुकरी यांच्यासोबत नाशिकच्या हवामानाचा आनंद ते घ्यायचे. यावेळी गरमागरम उसळ (सध्याची मिस्सळ), फाफडा आणि घाटी शेव, पोहे, पुरीसह बटाट्याची भाजी, हिरव्या, बारीक कापलेल्या कोथिंबीर मिरचीच्या चटणीसह गरमागरम झुणका बाकरीही त्यांनी नाशकात टेस्ट केल्या होत्या. याबाबतची माहिती त्यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे.

नाशिकचे खाद्यपदार्थ दिलीप कुमारांना आवडत

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com